ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
कच्च्या केळ्याची भाजी ही एक पारंपरिक, चविष्ट आणि आरोग्यदायी भाजी आहे, जी सहज आणि झटपट तयार करता येते.
साहित्य :- कच्ची केळी, हळद, धणे पावडर, जीर, हिंग, मीठ आणि मोहरी
ग्रेवी साहित्य : कांदा, टॅामेटो आणि आलं लसून पेस्ट
सर्वात आधी कच्या केळ्याला सोलून बारिक टुकडे करुन घ्या.
आता एका पॅनमध्ये थोडे तेल टाकून कांदा आणि आलं लसून पेस्ट परतवून घ्या त्यानंतर टॅामेटो टाकून ग्रेवी तयार करा.
एका वेगळ्या पॅनमध्ये थोडे तेल घ्या आणि जीर, हिंग, हळद, मोहरी टाकून तडका द्या आणि नंतर कच्ची केळी टाकून ते वाफवून घ्या.
आता केळ्यांच्या तुकड्यांना ग्रेवीमध्ये टाकून मसाले चांगले मिक्स करा आणि मंद आचेवर शिजवून घ्या.
अखेरीस भाजीमध्ये लिंबूचा रस पिळा आणि भाजी सुशोभित करा.
अस्वाद घेण्याकरिता भाजी तयार आहे.