ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
देवी- देवतांची पुजा केल्याने केवळ देव-देव प्रसन्न् होत नाही तर घरात सकारात्मक उर्जेचे वास असतो. पण पुजा करण्याचे काही नियम देखील असतात.
पुजा करताना चुकूनही या गोष्टी करु नये, जाणून घ्या.
देवी-देवतांची पुजा करताना मनात चुकूनही नकारात्मक विचार आणू नका, जर तुमच्या मनात असे विचार येत असतील तर देवांची माफी मागा.
पुजा करताना स्वच्छतेची काळजी घ्या. पुजा करण्याआधी सर्वप्रथम अंघोळ करा आणि स्वच्छ कपडे परिधान करा त्यानंतरच पुजा करा.
हिंदू धर्म शास्त्रानुसार, ब्रम्ह मुहूर्त आणि सूर्यास्ताच्या वेळीच पुजा केली पाहिजे. दुपारी पुजा करु नये.
पुजा करताना चेहऱ्यावर प्रसन्नता ठेवा. रागाच्या भरात पुजा केल्याने कोणतेही लाभ होत नाही.
पूजा करताना लक्षात ठेवा की तुमचे चेहरा घरातील मंदिराकडे असले पाहिजे. अन्यथा देव-देवता तुमच्यावर रागावू शकतात.