Today Gold Rate Saam Tv
बिझनेस

Gold Rate Today: आनंदाची बातमी! सोन्याचे दर ५५०० रुपयांनी घसरले; १० तोळ्यामागे किती पैसे मोजावे लागणार?

Gold Rate Today 26th July 2025: सोन्याच्या दरात आज सलग तिसऱ्या दिवशी घसरण झाली आहे. १० तोळ्यामागे ५५०० रुपयांची घसरण झाली आहे.

Siddhi Hande

सोन्याच्या दरात सलग तिसऱ्या दिवशी घसरण

१० तोळ्यामागे ५५०० रुपयांची घसरण

सोन्याचे दर घसरल्याने सर्वसामान्यांना दिलासा

सोन्याचे दर गेल्या अनेक महिन्यांपासून सतत वाढत आहेत. आता तर सोन्याच्या दराने उच्चांक गाठला आहे. १ तोळा सोन्याच्या १ लाख रुपये मोजावे लागत आहे. सोन्याचे दर भविष्यातदेखील असेच वाढत जातील, असं सांगितलं जात आहे. सोन्याने गेल्या काही वर्षात शेअर मार्केटपेक्षाही जास्त परतावा दिला असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे सोने घेणे ही एक गुंतवणूक आहे. परंतु सोन्याचे भाव सध्या एवढे वाढत आहेत की, हे सर्वसामान्यांना परवडण्याजोगे नाही आहे. त्यामुळे आता सोने खरेदी करण्यासाठी ग्राहकांनी पाठ फिरवल्याचे दिसत आहे.

सोन्याच्या दरात ५५०० रुपयांनी घसरण

गुडरिटर्न्सनुसार, आज सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. सलग दोन दिवसांपासून सोन्याचे दर घसरले आहेत. आज १ तोळा सोन्याच्या दरात ५५० रुपयांनी घसरण झाली आहे. १० तोळा सोन्याचे दर ५५०० रुपयांनी घसरले आहेत.

२४ कॅरेट सोन्याचे दर (24k Gold Rate)

आज २४ कॅरेट सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. १ तोळा सोन्याचे दर ९९,९३० रुपये झाले आहेत. या दरात ५५० रुपयांची घसरण झाली. १० तोळा सोन्याचे दर ९,९९,३०० रुपये आहेत. हे दर ५,५०० रुपयांनी घसरले आहेत. ८ ग्रॅम सोन्याचे दर ७९,९४४ रुपये आहेत. या दरात ४४० रुपयांनी घसरण झाली आहे.

२२ कॅरेट सोन्याचे दर (22k Gold Rate)

आज २२ कॅरेट सोन्याचे दर ५०० रुपयांनी घसरले आहेत. १ तोळा सोन्याचे दर ९१,६०० रुपये आहेत. १० तोळा सोन्याचे दर ९,१६,००० रुपये आहेत. या दरात ५००० रुपयांनी घसरण झाली आहे. ८ ग्रॅम सोन्याचे दर ७३,२८० रुपये आहेत. हे दर ४०० रुपयांनी घसरले आहेत.

१८ कॅरेट सोन्याचे दर (18k Gold Rate)

१८ कॅरेट सोन्याच्या दरात ४१० रुपयांनी घसरण झाली आहे. १ तोळा सोन्याची किंमत ७४,९५० रुपये आहेत. १० तोळा सोन्याचे दर ४१०० रुपयांनी घसरले आहेत. १० तोळा सोन्याचे दर ७,४९,५०० रुपये झाले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: अमरावती- मुंबई विमान सेवा बंद, प्रवाशांचे नियोजन कोलमडले

India National Food: भारताचे राष्ट्रीय अन्न कोणते आहे? ९९% लोकांना माहित नसेल

Ukdiche Modak : नैवेद्य बनवताना उकडीचे मोदक फुटतायत? 'ही' एक सोपी ट्रिक वापरून तर बघा

Manoj Jarange Patil Protest Live Updates : बीडच्या 2 आमदारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट

Today Gold Rate: सलग तिसऱ्या दिवशी सोन्याचे भाव वाढले; वाचा १ तोळ्यामागे किती पैसे मोजावे लागणार?

SCROLL FOR NEXT