Today Gold Rate Saam Tv
बिझनेस

Today Gold Rate: १० तोळा सोन्याचे दर ६००० रुपयांनी वाढले; वाचा २२ आणि २४ कॅरेटचे दर

Today Gold Rate Hike: आज सोन्याच्या दरात वाढ झाली आहे. प्रति तोळ्यामागे जवळपास ६०० रुपयांनी वाढ झाली आहे. तर १० तोळ्यामागे ६००० रुपयांनी वाढ झाली आहे.

Siddhi Hande

सोन्याच्या भावात गेल्या अनेक दिवसांपासून सातत्याने चढ-उतार होत आहेत. दरम्यान, आज सोन्याचे दर पुन्हा वाढले आहेत. मध्यंतरी सोन्याचे दर घसरले होते. त्यामुळे खरेदीदारांना दिलासा मिळाला होता. मात्र, आता पुन्हा हे दर वाढल्याने ग्राहकांच्या खिशाला फटका बसणार आहे. आज १० तोळा सोन्याच्या दरात जवळपास ६००० रुपयांची वाढ झाली आहे.

सोन्याचे दर जवळपास महिन्याभरापासूनच १ लाखांपेक्षा जास्त आहे. प्रति तोळ्यामागे ग्राहकांना लाखो रुपये मोजावे लागत आहेत. याचसोबत त्यावर लागणाऱ्या जीएसटीमुळे अजून पैसे वाढवून द्यावे लागत आहे. आज तर सोन्याचे भाव प्रति तोळा ६०० रुपयांनी वाढले आहे. जाणून घ्या आजचे सोन्याचे भाव.

सोन्याचे दर वाढले (Today Gold Rate Hike)

२४ कॅरेट (24k Gold Rate) सोन्याचे दर १,००,७५० रुपये प्रति तोळा आहे. या दरात ६०० रुपयांची वाढ झाली आहे.८ ग्रॅम सोन्याचे दर आज ८०,६०० रुपये आहेत. या दरात ४८० रुपयांनी वाढ झाली आहे. दर १० तोळा सोन्याच्या दरात ६००० रुपयांनी वाढ झाली आहे. हे दर १०,१७,५०० रुपये आहेत.

आज २२ कॅरेट सोन्याच्या दरात ५०० रुपयांची वाढ झाली आहे. प्रति तोळा सोन्याचे दर ९२,३०० रुपये आहेत. ८ ग्रॅम सोन्याची किंमत ७३,८४० रुपये आहेत. या दरात ४०० रुपयांची वाढ झाली आहे. तर १० तोळा सोन्याचे दर ९,२३,००० रुपये आहेत. या दरात ५००० रुपयांची वाढ झाली आहे.

आज १८ कॅरेट सोन्याच्या दरात प्रति तोळ्यामागे ४१० रुपयांची घसरण झाली आहे. आज हे दर ७५,५२० रुपये आहेत. ८ ग्रॅम सोन्याचे दर ३२८ रुपयांनी घसरले आहेत. आजचे दर ६०,४१६ रुपये आहेत. १० तोळा सोन्याचे दर ४,१०० रुपयांनी वाढले आहेत. हे दर ७,५५,२०० रुपये आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : रायगड समुद्रात बोट बुडाली

'नोरा फतेहीसारखी फिगर बनव' ३ तास जिम अन् उपाशी ठेवलं; पतीकडून पत्नीचा अतोनात छळ

Neena Gupta: 'त्यांच्याकडे नसल्यामुळे त्यांना हेवा वाटतो...' शॉर्ट्स घातल्याबद्दल ट्रोल करणाऱ्या व्यक्तीला नीना गुप्तांचं बेधडक उत्तर

Budhaditya Rajyog: 17 सप्टेंबरपासून या राशींचं नशीब पालटणार; सूर्य आणि बुधाची युती करणार मालामाल

Anagha Atul: आधीच कट्यार त्यात जीवघेणी धार...

SCROLL FOR NEXT