
रक्षाबंधननंतर सोन्याच्या दरात मोठा बदल झालेला आहे. रक्षाबंधनच्या दिवशी सोन्याचे दर वाढले होते त्यामुळे दरवर्षीपेक्षा या वर्षी रक्षाबंधनच्या दिवशी सोने खरेदी कमी प्रमाणात झाली. परंतु त्यानंतर आता सोन्याच्या दरात घसरण सुरु झाली आहे. सोन्याचे दर घसरले आहेत. आज सोन्याच्या दरात जवळपास ७६० रुपयांनी घसरण झाली आहे.
रक्षाबंधनाच्या दिवशी दरवर्षी भाऊ बहिणींसाठी सोन्याची भेटवस्तू देतात किंवा बहिणी भावासाठी काहीतरी घेतात. परंतु यावर्षी अपेक्षेपेक्षा कमी सोने खरेदी झाले. परंतु आता सोन्याचे दर घसरले आहे. रक्षाबंधनानंतर सोन्याच्या दराला उतरती कळा लागली आहे.
सोन्याच्या दरात जरी घसरण झाली तरीही सोन्याचे दर एक लाखांपेक्षा जास्त आहे. मागच्या आठवड्यापासून सोन्याचे दर १ लाखांपेक्षा जास्त आहेत. त्यामुळे आजही सोने खरेदी करावे की नाही असा प्रश्न खरेदीदारांना पडलेला आहे.
सोन्याचे दर (Today Gold Rate)
आज सोन्याच्या दरात प्रति तोळ्यामागे ७६० रुपयांची घसरण झाली आहे. आज २४ कॅरेट सोन्याचे दर १,०२,२८० रुपये प्रति तोळा झाले आहेत. ८ ग्रॅमचे दर ८१,८३४ रुपये झाले आहेत. यामध्ये ६०८ रुपयांची घसरण झाली आहे. १० तोळ्यामागे ७६०० रुपयांची घसरण झाली आहे. १० तोळ्याचे दर १०,२२,८०० रुपये आहेत.
२२ कॅरेट सोन्याचे दर (22k Gold Rate Today)
आज २२ कॅरेट सोन्याच्या दरात ७०० रुपयांची घसरण झाली. १० ग्रॅमची किंमत ९३,७४० रुपये आहे. ८ ग्रॅम सोन्याचे दर ७५,००० रुपये झाले आहेत. या दरात ५६० रुपयांची घसरण झाली आहे. आणि १० तोळा सोन्याच्या दरात ७०० रुपयांची घसरण झाली आहे.हे दर ९,३७,५०० रुपये झाले आहेत.
१८ कॅरेट सोन्याच्या दरात घसरण (18k Gold Rate Fall Today)
१८ कॅरेट सोन्याच्या दरात ५७० रुपयांची घसरण झाली आहे. हे दर ७६,७१० रुपये झाले आहेत. ८ ग्रॅम सोन्याचे दर ६१,३६८ रुपये आहेत. १० तोळ्याचे दर ७,६७,१०० रुपये आहेत. या दरात ५७०० रुपयांची घसरण झाली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.