Sakshi Sunil Jadhav
तुम्ही सोनाराकडून काही खेरदी केल्यास तो तुम्हाला तुमचे दागिने गुलाबी कागदात गुंडाळून देत असेल.
हा कागद प्रत्येक ज्वेलर्सच्या दुकानात उपलब्ध असतो.
गेल्या काही वर्षांपासून ज्वेलर्स अशाच कागदात दागिने गुंडाळलेले असतात.
तुम्हाला कधी प्रश्न पडलाय का, की वर्षानुवर्षे दागिने चमकदार गुलाबी कागदात का गुंडाळून देतात? चला जाणून घेऊ.
काही सोनार म्हणाले की, याचे काही स्पष्ट उत्तर नाही. ही वर्षानुवर्षे चालत आलेली परंपरा आहे. ती आजही सुरु आहे.
दागिन्यांना कागद गुंडाळल्याने त्यांना कोणतेही डाग किंवा ओरखडे पडत नाहीत.
शिवाय गुलाबी कागदावर थोडीशी धातूची चमक असते. ज्यामुळे दागिने अधिक चमकदार आणि सुंदर दिसतात.
जर तेच दागिन जर पांढऱ्या कागदात किंवा वेगळ्या कागदात ठेवले तर दागिने तितके आकर्षक आणि चमकदार दिसत नाहीत.