Sakshi Sunil Jadhav
मुंबईत तुम्हाला गोव्याचा फिल देणारा सुंदर स्पॉट म्हणजे गोराई बीच.
मुंबईपासून अगदी हाकेच्या अंतरावर तुम्हाला गोव्याचा आनंद घेता येणार आहे.
गोराई बीचवर पांढरीसरी वाळू, नारळाची उंच उंच झाडं पाहून तुम्हाला गोव्याला आल्याचा फील येईल.
जुहू, चौपाटीप्रमाणे येथे गर्दी नसल्यामुळे आरामात वेळ घालता येईल.
तुम्हाला गोव्याप्रमाणे गोराईत स्थानिक फिश थाळी, कोळंबी, सुरमई फ्राय आणि नारळाच्या तेलात बनवलेले पदार्थ मिळतात.
गोराईजवळच एस्सेल वर्ल्ड, वॉटर किंग्डम आणि ग्लोबल विपश्यना पॅगोडा यासगळ्याचा अनुभव तुम्ही 1 DAY Tripमध्ये घेऊ शकता.
गोराई बीचला पोहोचण्यासाठी फेरीबोटचा प्रवास करावा लागतो, हा प्रवास गोव्याच्या फेरीचा फिल देतो.