Gold- Silver Price Today Saam Tv
बिझनेस

Gold Price Today: आठवड्याच्या पहिल्या दिवशी सोन्याला चकाकी, १० तोळे २२,४०० रुपयांनी महागले; २४ आणि २२ कॅरेटचे आजचे दर किती?

Gold- Silver Price Today: सोनं-चांदीच्या दरामध्ये मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे आज सोनं-चांदी खरेदी करताना खिशाला कात्री लागणार आहे. १० तोळे २२,४०० रुपयांनी महागले तर १ ग्रॅम चांदी १५ रुपयांनी महागली आहे. वाचा आजचे दर किती?

Priya More

Summary -

  • आठवड्याच्या पहिल्या दिवशी सोन्याच्या दरात मोठी वाढ

  • १० तोळा सोनं २२,४०० रुपयांनी महागले

  • चांदीच्या दरातही मोठी वाढ,

  • १ किलो चांदी ३००००० रुपयांवर पोहचली

सोनं-चांदीच्या दरात गेल्या काही दिवसांपासून चढ-उतार सुरू आहे. आज आठवड्याच्या पहिल्या दिवशी सोन्याचे दरात मोठी वाढ झाली आहे. सोन्याचे दर कमी होतील अशी आशा ग्राहकांना होती. पण सोन्याचे दर कमी होण्याऐवजी वाढले आहेत. सोन्यापाठोपाठ चांदीने देखील उच्चांक गाठला आहे. सोनं-चांदीचे दर वाढल्यामुळे ग्राहकांमध्ये नाराजी पाहायला मिळत आहे. आज सोनं-चांदी खरेदी करताना ग्राहकांच्या खिशाला कात्री लागणार आहे. १० तोळा सोन्याच्या दरात तब्बल २२,४०० रुपयांनी वाढ झाली आहे. तर १ ग्रॅम चांदीचे दर १५ रुपयांनी वाढले आहेत. सोनं-चांदी खरेदी करायला आज जर तुम्ही जाणार असाल तर आजचे १८, २२ आणि २४ कॅरेटच्या १ तोळा सोन्याचे दर आणि चांदीचे दर किती आहेत ते जाणून घ्या...

गुड रिटर्न्सने दिलेल्या माहितीनुसार, आज २४ कॅरेटच्या सोन्याच्या दरात मोठी वाढ झाली आहे. २४ कॅरेटच्या १ तोळा सोन्याच्या दरात २,२४० रुपयांनी वाढ झाली आहे. आज २४ कॅरेटचे एक तोळा सोनं खरेदीसाठी १,५८,८४० रुपये खर्च करावे लागणार आहेत. रविवारी १ तोळा सोनं १,५६,६०० रुपयांना विकले गेले. तर २४ कॅरेटच्या १० तोळा सोन्याच्या दरात तब्बल २२,४०० रुपयांनी वाढ झाली आहे. हे सोनं खरेदी करण्यासाठी आज तुम्हाला १५,८८,४०० रुपये खर्च करावे लागणार आहे. रविवारी हेच सोनं १५,६६,००० रुपयांना विकले गेले.

आज २२ कॅरेटच्या सोन्याच्या दरात देखील मोठी वाढ झाली आहे. २२ कॅरेटच्या १ तोळा सोन्याच्या दरामध्ये २,०५० रुपयांनी वाढ झाली आहे. हे सोनं खरेदी करण्यासाठी आज तुम्हाला १,४५,६०० रुपये खर्च करावे लागणार आहे. रविवारी हे सोनं १,४४,५५० रुपयांना विकले गेले. तर २२ कॅरेटचे १० तोळा सोनं २०,५०० रुपयांनी स्वस्त झालं आहे. हे सोनं खरेदी करण्यासाठी आज तुम्हाला १४,६,००० रुपये खर्च करावे लागणार आहेत. बुधवारी हे सोनं १४,३५,५०० रुपयांना विकले गेले.

२४ आणि २२ कॅरेटच्या सोन्यापाठोपाठ आज १८ कॅरेटच्या सोन्याच्या दरात देखील मोठी वाढ झाली आहे. आज १८ कॅरेटच्या १ तोळा सोन्याच्या दरात १,६८० रुपयांनी वाढ झाली आहे. हे सोनं खरेदीसाठी आज तुम्हाला १,१९,१३० रुपये खर्च करावे लागतील. रविवारी हे सोनं १,१७,४५० रुपयांना विकले गेले. तर आज १८ कॅरेटच्या १० तोळा सोन्याच्या दरामध्ये १६,८०० रुपयांची वाढ झाली. हे सोनं खरेदी करण्यासाठी आज तुम्हाला ११,९१,३०० रुपये खर्च करावे लागणार आहेत. रविवारी हे सोनं ११,७४,५०० रुपयांना विकले गेले.

दरम्यान, सोन्यापाठोपाठ आज चांदीच्या दरात देखील मोठी वाढ झाली आहे. आज १ ग्रॅम चांदीच्या दरात १५ रुपयांनी वाढ झाली आहे. १ ग्रॅम चांदी खरेदीसाठी आज तुम्हाला ३०० रुपये खर्च करावे लागणार आहे. तर १ किलो चांदीचे दर तब्बल १५,००० रुपयांनी वाढले आहेत. ही चांदी खरेदीसाठी आज तुम्हाला ३,००,००० रुपये खर्च करावे लागणार आहे.

१ ग्रॅम सोन्याचे तुमच्या शहरातील आजचे दर -

मुंबई - १५,८८४ रुपये

पुणे- १५,८८४ रुपये

दिल्ली - १५,६७४ रुपये

चेन्नई - १५,९८२ रुपये

बंगळुरू - १५,८८४ रुपये

हैदराबाद - १५,८८४ रुपये

अहमदाबाद - १५,६६४ रुपये

चांदीचे आजचे दर -

१ ग्रॅम - ३०० रुपये

१० ग्रॅम - ३,००० रुपये

१०० ग्रॅम - ३०,००० रुपये

१००० ग्रॅम - ३,००,००० रुपये

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Badlapur Tourism : बदलापूरजवळ डोंगररांगांमध्ये वसलाय निसर्गाचा अद्भुत खजिना, खूप कमी लोकांना माहितेय 'हे' ठिकाण

Sagar Moholkar: कुख्यात गुंड सागर मोहोळकरचा जुना VIDEO व्हायरल, तरुणाला भरचौकात बेदम मारहाण

RBI Note Rules: होळीच्या रंगामुळे नोटा खराब झाल्या तर काय करावे? RBIचे नवे नियम वाचाच

Maharashtra Live News Update : विरारमध्ये धुळवडच्या दिवशी दोन गटात हाणामारी

होळीच्या तोंडावर आदिवासींचे मनरेगाचे पैसे थकले; यशोमती ठाकूरांचे सरकारवर जोरदार टिकास्त्र

SCROLL FOR NEXT