Today Gold Rate Saam Tv
बिझनेस

Today Gold Rate: खुशखबर! सोन्याच्या दरात ११४०० रुपयांची घसरण, १० तोळ्यासाठी किती पैसे मोजावे लागणार?

Today Gold Rate Fall: सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे. आज सोन्याचे दर प्रति तोळा १,१४० रुपयांनी घसरण झाली आहे. त्यामुळे आज सोने खरेदीसाठी उत्तम मूहूर्त आहे.

Siddhi Hande

सोन्याचे दर गगनाला भिडले आहेत. एक तोळा सोन्याचे दर १ लाखांवर जाऊन पोहचले आहेत. त्यामुळे सोने खरेदी करावे की नाही असा प्रश्नच सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे. सोन्याचे दर दिवसेंदिवस वाढत होते. परंतु आज या दरवाढीला ब्रेक लागला आहे. आज सोन्याचे दर घसरले आह

आज २४कॅरेट सोन्याचे दर प्रति तोळा १,००,३७० रुपये आहे. या दरात १ हजारांपेक्षा जास्त रुपयांनी कपात झाली आहे. त्यामुळे तुम्हाला दर सोने खरेदी करायचे असेल तर आजचा मूहूर्त चांगला आहे. आजच तुम्ही सोने खरेदी करा. जेणेकरुन तुम्हाला फायदा होईल .

सोन्याचे दर कितीने घसरले?

आज सोन्याचे दर प्रति तोळा १,१४० रुपयांनी घसरले आहेत. आज २ कॅरेट १ तोळा सोन्याची किंमत १,००,३७० रुपये आहे. हे दर काल १,०१,५१० रुपये होते. यात घसरण झाली आहे. ८ ग्रॅम सोन्याचे दर ८०,२९६ रुपये आहे. या दरात ९१२ रुपयांनी घसरण झाली आहे. तर १ ग्रॅम सोन्याची किंमत १०,०३७ रुपये आहे. या दरात ११४ रुपयांनी घसरण झाली आहे. म्हणजेच १० तोळ्यासाठी ११४०० रुपयांची घसरण झाली आहे.

२२ कॅरेट सोन्याचे दर

आज २२ कॅरेट सोन्याच्या दरात १०५० रुपयांनी घट झाली आहे. आज २२ कॅरेट सोने ९२,००० रुपयांवर विकले जात आहे. ८ ग्रॅम सोन्याच्या दरात ८४० रुपयांनी घसरण झाली आहे. आज ८ ग्रॅम सोने ७३,६०० रुपयांवर विकले जात आहे.

१८ कॅरेट सोन्याचे दर

१८ कॅरेट सोन्याच्या दरात ८६० रुपयांनी घसरण झाली आहे. हे दर ७५,२८० रुपये झाले आहेत. तर ८ ग्रॅम सोन्याचे दर ६०,२२४ रुपये आहे. या दरात ६८८ रुपयांनी घट झाली आहे. सोन्याच्या दरात आज घट झाल्याने खरेदीदारांना मात्र दिलासा मिळाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ajit Pawar : रस्त्याची दयनीय अवस्था, गावकऱ्यांना संताप अनावर, अजित पवारांना काळे झेंडे दाखवण्याचा दिला इशारा

Jalgaon : मध्यरात्री काळाचा घाला, दुचाकीवर जाणाऱ्या ४ मित्रांचा मृत्यू, जळगावमध्ये भीषण अपघात

Aditi Tatkare: ५२ लाख महिला अपात्र नाहीत, मंत्री आदिती तटकरेंचं लाडक्या बहि‍णींना आवाहन

Maharashtra Live News Update: भाजपच्या आमदाराने शिवसेना आमदाराच्या घरी 100 पोलीस मध्यरात्री घरात पाठवले पहा

Local Body Election : भाजपचा प्रचार का करतो? काँग्रेस नेत्याने कारमध्ये कोंबून मारले, नागपूर पोलिसांनी केली अटक

SCROLL FOR NEXT