Vishal Gangurde
इस्रायल-इराण युद्धाचा भारतावर मोठा परिणाम झाला आहे. या युद्धामुळे शुक्रवारी सोन्याच्या किंमती वाढल्या आहेत.
सोन्याचा दर एका तोळ्यामागे २८० रुपयांनी वाढला आहे.
युद्धामुळे २४ कॅरेटचे १० ग्रॅम सोन्यासाठी १,०१,६८० रुपये मोजावे लागणार आहे.
सोन्याचा भाव २२ एप्रिल रोजी सोन्याचा भाव १,०१,६०० रुपयांवर पोहोचला होता.
तर चांदीच्या किंमतीतही मोठी वाढ झाली आहे. २२ कॅरेट सोन्याच्या दरात प्रति तोळा २५० रुपयांनी वाढ झाली आहे.
१८ कॅरेट सोन्याच्या दरात प्रति तोळा २१० रुपयांनी वाढ झालीये.
१८ कॅरेटसाठी किती रुपये मोजावे लागणार?
१८ कॅरेटचे एक तोळा सोनं खरेदी करण्यासाठी ७६,२६० रुपये खर्च करावे लागणार आहेत.