Gold Rate Today: सोन्याच्या दरात पुन्हा वाढ; 24K गोल्ड 21,200 रूपयांनी वाढलं, पाहा तुमच्या शहरातील दर

Gold Price Today: गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या किमतीत चढ उतार होताना दिसतोय. काल सोन्याच्या किमती घटल्या होत्या. मात्र आजच्या दिवशी सोन्याच्या किमतीत वाढ झाल्याच पाहायला मिळतंय.
Gold Price Today
Gold Price TodaySaam Tv
Published On

सलग तीन दिवसांपासून सराफा बाजारात सोन्याच्या किमती वाढताना दिसतायत. अशातच २४ कॅरेट सोन्याने प्रति १ ग्रॅम २१२ रुपयांची वाढ झाली आहे. आज म्हणजेच शुक्रवारी सोन्याच्या किमती वाढत असून एका महिन्यापेक्षा जास्त काळातील उच्चांक गाठला आहे.

काय कारण?

या वाढीमागील कारण म्हणजे इस्रायलने इराणवर केलेल्या हल्ल्यानंतर मध्य पूर्वेतील वाढता तणाव. या परिस्थितीत गुंतवणूकदारांनी सुरक्षित गुंतवणूक पर्यायांकडे म्हणजेच सुरक्षित आश्रयस्थानांच्या मालमत्तेकडे वळलेत. ज्यामुळे सोन्याची मागणी वाढली आहे.

Gold Price Today
Gold Price Today:'सुवर्णनगरी'त सोन्याचे दर पुन्हा वाढले, १ तोळ्यासाठी किती पैसे मोजावे लागणार?

काय आहे आज २४ कॅरेट सोन्याचा दर?

२४ कॅरेट सोन्याचा दर १० ग्रॅममध्ये २१२० रुपयांनी वाढून १,०१,५५० रुपये झालाय. यापूर्वी तो ९९,४३० रुपये होता. तर २४ कॅरेट सोन्याचा दर १०० ग्रॅममध्ये २१,२०० रुपयांनी वाढून १०,१५,५०० रुपये झाला आहे.

२२ कॅरेट सोन्याचा दर

शुक्रवारी २२ कॅरेट सोन्याचा दर १० ग्रॅममध्ये १,९५० रुपयांनी वाढून ९३,१०० रुपये झाला आहे. गुरुवारी हा दर ९१,१५० रुपये होता. २२ कॅरेट सोन्याचा दर १०० ग्रॅममध्ये १९,५०० रुपयांनी वाढून ९,३१,००० रुपये झाला आहे. गुरुवारी हा दर ९,११,५०० रुपये होता.

Gold Price Today
8th Pay Commission: आठवा वेतन आयोग कधी लागू होणार? पगारवाढीसाठी २ वर्षे वाट पाहावी लागणार

१८ कॅरेट सोन्याचा दर

१८ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम १६०० रुपयांनी वाढून ७६,१८० रुपयांवर पोहोचला आहे. तो एका दिवसापूर्वी ७४,५८० रुपयांवर पोहोचला होता. त्याच वेळी, १८ कॅरेट सोन्याच्या १०० ग्रॅमचा भाव १६,००० रुपयांनी वाढून ७,६१,८०० रुपयांवर पोहोचला, तर तो एका दिवसापूर्वी ७,४५,८०० रुपयांवर होता.

Gold Price Today
Share Market Today: शेअर मार्केटमध्ये 'ब्लॅक फ्रायडे'; सेन्सेक्स १३०० तर निफ्टी ४०० अंकानी घसरला

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com