Gold Price Today:'सुवर्णनगरी'त सोन्याचे दर पुन्हा वाढले, १ तोळ्यासाठी किती पैसे मोजावे लागणार?

gold rate Jalgaon : जळगावच्या सराफ बाजारात चांदीच्या दरात विक्रमी वाढ झाली आहे. अवघ्या दहा दिवसांत चांदीने १०,००० रुपयांची उडी घेतली असून दर १,०८,००० रुपये किलोवर पोहोचला आहे.
Gold Price Today: सोन्याच्या दरात चढ-उतार सुरूच
Gold Price TodaySaam Tv
Published On

संजय महाजन, जळगाव प्रतिनिधी

gold silver price hike : सुवर्णनगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जळगावात मागील दहा दिवसांत चांदीच्या दरात तब्बल १०,००० रुपयांची विक्रमी वाढ झाली आहे. सोनं आणि चांदीची किंमत वाढल्यामुळे ग्राहकांमध्ये मोठ्या प्रमाणात संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. आज एका दिवसात तब्बल २,२०० रुपयांनी वाढ होत चांदीने १,०८,००० प्रति किलो असा ऐतिहासिक टप्पा गाठला. सध्या सोने-चांदी खरेदीसाठी दररोज दरात होणाऱ्या चढ-उतारामुळे ग्राहकांमध्ये अनिश्चितता आहे. त्याचा थेट परिणाम ग्राहकांच्या संख्येवर झाला असून बाजारात ग्राहकांची वर्दळ कमी होत आहे.

चांदीच्या दरात विक्रमी वाढ झाली आहे. मागील दहा दिवसांत दहा हजार रूपयांनी चांदीची किंमत वाढली आहे. चांदीचा भाव प्रति किल एक लाख रूपयांवर पोहचला आहे. तर सोन्याची किंमत प्रति तोळा २०० रूपयांनी वाढून ९९ हजार रूपयांपर्यत पोहचली आहे. युनायटेड स्टेट्ससह अन्य देशांमध्ये सुरू असलेल्या ट्रेड वॉर आणि जिओ-पॉलिटिकल तणावाचा परिणाम थेट सोन्या-चांदीच्या दरावर होत आहे. इतर देशांमध्ये सुरू असलेल्या व्यापार संघर्षामुळे मागील काही दिवसांत मोठ्या प्रमाणावर दर वाढले होते. जळगावच्या सराफा बाजारात जीएसटीशिवाय सोनं प्रति तोळा ९८ हजार ९८० रूपये इतके आहे.

Gold Price Today: सोन्याच्या दरात चढ-उतार सुरूच
Gold Price Today: सोन्याच्या दरात पुन्हा वाढ, २४ आणि २२ कॅरेटचे तुमच्या शहरातील आजचे भाव किती?

जागतिक व्यापार संघर्ष व जिओ-पॉलिटिकल तणावामुळे ही वाढ झाल्याचे व्यापाऱ्यांचे मत आहे. यामुळे ग्राहकांमध्ये संभ्रम असून, खरेदीसाठी योग्य वेळ मानला जातोय. अलीकडेच काही देशांमध्ये व्यापारी करार झाल्यामुळे या परिस्थितीत थोडी स्थिरता येत असून त्याचा परिणाम चांदीच्या दर वाढीवर झाला आहे. सध्या चांदी ९९,००० वरून थेट १,०८,००० पर्यंत पोहोचली आहे. ही दरवाढ येत्या काळात आणखी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे ग्राहकांनी सद्यस्थितीत चढत्या दरालाच योग्य संधी मानत सोने-चांदी खरेदीचा निर्णय घ्यावा, असे सराफ बाजारातील दुकानदार सांगत आहेत.

Gold Price Today: सोन्याच्या दरात चढ-उतार सुरूच
Pune : चाकण हादरलं! ७ जणांनी महिलेला किडनॅप केलं, खोलीत डांबून बलात्कार केला

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com