Share Market Today: शेअर मार्केटमध्ये 'ब्लॅक फ्रायडे'; सेन्सेक्स १३०० तर निफ्टी ४०० अंकानी घसरला

Share Market Today Fall: शेअर मार्केटमध्ये आज निफ्टी आणि सेन्सेक्स दोन्हीमध्ये घसरण झाली आहे. इराण आणि इस्त्रायल युद्धाचा शेअर मार्केटवर परिणाम झाला आहे.
Share market today
share market Saam tv
Published On

आज सकाळी शेअर मार्केमध्ये खूप संथ सुरुवात झाली आहे. शेअर मार्केटमधील गुंतवणूकदारांसाठी आजचा दिवस ब्लॅक फ्रायडे असल्याचे दिसत आहे. आज शेअर मार्केट धडामधूम आपटला आहे. शुक्रवारी सकाळी शेअर मार्केट सुरु होताच निफ्टी आणि सेन्सेक्स दोन्ही कोसळला आहे.

Share market today
Share Market Today: रेपो रेटमधील कपातीनंतर शेअर मार्केटमध्ये तेजी | VIDEO

सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये पडझड (Sensex And Nifty Fall)

शुक्रवारी बाजार उघडताच सेन्सेक्स १३०० आणि निफ्टी ४०० अंकानी घसरला आहे. सेन्सेक्समध्ये १.६ टक्क्यांनी घसरण झाली आहे. सेन्सेक्स ८०,३५४ वर पोहचला आहे. तर निफ्टी ४०० पेक्षा जास्त अकंनी घसरला आहे. १.७ टक्क्यांनी घसरुन २४,४७३ वर पोहचला आहे.

आज शेअर मार्केटमध्ये बीएसई आणि स्मॉल कॅप निर्देशंकातही घसरण झाली आहे. बीएसईचे स्टॉक १.५ टक्क्यांनी घसरले आहे. बीएसईअंतर्गत सूचीबद्ध सर्वच कंपन्यांच्या शेअर्समध्ये घसरण झाली आहे. कंपन्याने बाजार भांडवल ४४९.६ वरुन ४४२.५ कोटींवर आले आहे.

Share market today
Share Market: शेअर बाजार कोसळला; गुंतवणूकदारांचे १० लाख कोटी पाण्यात

इस्त्रायल आणि इराणमधील युद्धाचा परिणाम शेअर मार्केटवर झाला आहे. इस्त्रायलने आज सकाळी इराणवर हल्ला केला. त्याचा परिणाम शेअर मार्केटवर झाला आणि शेअर्स घसरले.

गुंतवणूकदारांचे ७ लाख बुडाले (Share Market Fall Today)

शेअर मार्केटमध्ये घसरण झाल्याने गुंतवणूकदारांचे तब्बल ७ लाखांचे नुकसान झाले आहे. आज दिवसभरही शेअर मार्केटमध्ये घसरण होण्याची शक्यता आहे. कालदेखील दुपारी शेअर मार्केटमध्ये कपात झाली आहे. एअर इंडियाच्या विमानाच्या अपघातानंतर ही पडझड झाली होती. दरम्यान, आता इस्त्रायल आणि इराण युद्धानंतरही शेअर मार्केटमध्ये पडझड झाली आहे.

Share market today
Share Market : शेअर मार्केटमध्ये फुटला 'ट्रम्प टॅरिफ बॉम्ब! सेन्सेक्स ९३० अंकांनी धडामधूम, निफ्टीची आपटी

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com