
नवी दिल्ली : चीनने इरणानच्या मदतीसाठी धाव घेतल्यामुळे अमेरिकेची चिंता वाढली. इस्रायलशी झालेल्या संघर्षानंतर इराणने पुन्हा एकदा शस्त्रसाठा वाढवण्यास सुरुवात केली आहे. यासाठी चीनकडून इराणला मोठी मदत मिळतेय. पाहू यासंदर्भातला एक रिपोर्ट.
जगावर पुन्हा एकदा युद्धाचं संकट ओढवलंय. मात्र यावेळी या युद्धात दुसरे-तिसरे कुणी नव्हे तर थेट दोन महासत्ता आमनेसामने येणार आहेत. त्या म्हणजे चीन आणि अमेरिका. आपल्या राष्ट्राध्यक्षाची हत्या आणि गेल्या वर्षी केलेला हल्ल्याचा बदला घेण्यासाठी इराणनं इस्त्रायलविरोधात युद्धाची जोरदार तयारी सुरू केलीय. यासाठी चीन पुढं सरसावलंय. इराणचा शस्त्रसाठा वाढवण्यासाठी चीनने इराणला तब्बल १,००० टन सोडियम परक्लोरेट नावाचं घातक रसायन पाठवलंय. हे मिसाईल केमिकल ब्लॅक आरडीएक्स म्हणूनही ओळखलं जातं. या रसायनात २६० क्षेपणास्त्र तयार करण्याची क्षमता असून इराण थेट इस्त्रायला निस्तेनाबूत करण्याचाच प्लॅन करतयं की काय? अशी चर्चा आता सुरू झालीय. हे रसायन किती घातक आहे ते पाहूयात.
इराण करणार इस्त्रायलवर हल्ला ?
सोडियम परक्लोरेट या रसायनाचा क्षेपणास्त्राच्या इंधनासाठी वापर होतो. १,००० टन सोडियम परक्लोरेटपासून सुमारे ९६० टन अमोनियम परक्लोरेट तयार होऊ शकते. यातून इराण लांब पल्ल्याची तब्बल २६० क्षेपणास्त्रे तयार करू शकणार आहे. ही सर्व स्फोटक रसायनं इराणच्या इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्स येथे दाखल झाल्याची माहिती सुत्रांनी दिलीय. त्यामुळेच इस्रायल-अमेरिकेची चिंता वाढलीय. मात्र इराण ही तयारी का करतंय आणि मध्य पूर्वेत युद्धसदृश परिस्थिती का निर्माण झालीय त्याचं मूळ कारण पाहूयात.
मध्यपूर्वेतील मीडिया रिपोर्टनुसार. इस्रायल आणि अमेरिका मिळून इराणच्या अणुचाचणीचा प्रयोग शाळेंवर हल्ला करणार आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हे वृत्त फेटाळून लावलंय. तर अयातुल्लाह अल खोमेनी यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर विश्वास नसल्याचं म्हटलंय.
इराणला मदत करून मध्येपूर्वेत अमेरिकेचं महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न चीनचा आहे. तर २६ ऑक्टोबर २०२४ ला इस्रायलच्या हल्ल्यात इराणचं मोठं नुकसान झालंय. त्यामुळे इराणनं सतर्कता बाळगून डोळे वटारून पाहणाऱ्या अमेरिकेला देखील उत्तर देण्याच्या तयारी सुरु केलीय. मात्र इराण-इस्रायलच्या निमित्तानं अमेरिका-चीनही या युद्धात उडी घेतली तर सारं जग होरपळलं जाऊ शकतं आणि त्याचा फटका भारतालाही बसू शकतो. कारण इराण हा भारताला कच्चं तेल पुरवतो. अशातच इस्राइलसोबत युद्ध पेटल्यास कच्च्या तेलाच्या पुरवठ्यावर थेट परिणाम होऊ शकतो आणि त्याचा थेट फटका भारताला बसल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे निखाऱ्यांवर असलेल्या मध्य पूर्वेतल्या परिस्थितीकडे साऱ्या जगाचं लक्ष लागलंय.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.