सांगली : सांगलीच्या दुष्काळी भागाला वरदान ठरणाऱ्या म्हैसाळ सिंचन योजनेच्या कामात भ्रष्टाचार झाल्याचा प्रकार समोर आला आहे. बंदिस्त पाईपलाईनच्या कामात तब्बल दहा लाख ६० हजारांचा भ्रष्टाचार करत शासनाची संबंधित ठेकेदाराकडून फसवणूक करण्यात आली आहे. याप्रकरणी उमदी पोलीस ठाण्यामध्ये ठेकेदाराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सांगली जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या म्हैसाळ सिंचन योजनेचे काम निविदा प्रक्रिया राबवून शिवशक्ती कन्स्ट्रक्शन कंपनीला देण्यात आले होते. हे काम करताना सिंचन योजनेसाठी वापरण्यात आलेल्या पाइपलाईनमध्ये घोटाळा झाल्याचे समोर आले होते. याबाबत जतचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे- पाटील यांच्याकडे तक्रार केली होती. या प्रकरणी चौकशी करण्यात आली.
ठेकेदारावर गुन्हा दाखल
म्हैसाळ सिंचन योजनेतुन वंचित गावांना पाणी देण्यासाठी बंदिस्त पाईपलाईनचे काम सुरू आहे. मात्र संबंधित ठेकेदाराकडुन निकषानुसार पाईपलाईन घालण्यात आल्या नसल्याचा प्रकार समोर आला होता. यावरून घोटाळा झाल्याचे समोर आल्यानंतर शिवशक्ती कन्स्ट्रक्शन कंपनीचे मालक मोहन जंगम यांच्या विरोधात शासनाची फसवणूक केल्या प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.
सांगलीत १८९ कोटी विक्रमी जीएसटी कर संकलन
सांगली जिल्ह्यामध्ये जीएसटी संकलनात मे महिन्यात चांगलीच वाढ झाली आहे. १८९ कोटी इतके विक्रमी जीएसटी संकलन झाले आहे. नवीन आर्थिक वर्षात, गेल्या वर्षाच्या मे महिन्याच्या तुलनेत ४० टक्क्यांनी वाढ झाली आहे. गेल्या वर्षी मे महिन्यात १३५ कोटींचे कर संकलन झालं होतं. तर यंदाच्या मे महिन्यात त्याच्यात ५४ कोटींची वाढ होऊन १८९ कोटी इतका जीएसटी कर मे महिन्यात जमा झाला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.