Today Gold Rate Saam Tv
बिझनेस

Gold Rate: रक्षाबंधनाला सोन्याचे दर घसरले, तरीही विक्री कमीच; वाचा आजचे भाव

Gold Rate Today: काल रक्षाबंधननिमित्त सोन्याच्या खरेदीत वाढ होईल, असं वाटलं होतं. परंतु सराफा बाजारात तुलनेने कमी खरेदी झाली. १ तोळा सोन्याचे दर १ लाखांपेक्षा जास्त झाले आहेत. त्यामुळे सोनं घेणं सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणारे नाही.

Siddhi Hande

काल रक्षाबंधन साजरा झाला. रक्षाबंधनाला बहीण-भावाला राखी बांधते. भाऊ बहिणीला भेटवस्तू देतात. दरम्यान, अनेक भाऊ आपल्या बहिणीला राखीपौर्णिमानिमित्त सोने, चांदीचे दागिने भेट देतात. यामुळे यादिवशी सूवर्णबाजारपेठेत गर्दी होते. यंदा मात्र सोन्याचा भाव १ लाख १ हजार २०० प्रतिदहा ग्रॅम (विना जीएसटी) असल्याने सोन्याच्या विक्रीत घट झाली होती. चार दिवसात सोन्याच्या भावात ९०० रुपयांची (प्रती दहा ग्रॅम) वाढ झाली तर चांदीच्या भावात ३ हजारांची वाढ (प्रतिकिलो) झाली.

आंतरराष्ट्रीय घडामोडीमुळे सोने, चांदीच्या भावात गेल्या वर्षभरात वाढ झाली. गेल्या गुढीपाडव्यापासून तर सोने लाखावर पोचले (प्रतिदहा ग्रॅम) आजही सोन्याचा भाव १ लाख १ हजार २०० प्रतिदहा ग्रॅम (विना जीएसटी) होते. यामुळे सोन्याच्या विक्रीत घट झाल्याची माहिती सुवर्ण व्यावसायिकांनी दिली. सकाळपासून राखीपोर्णिमानिमित्त सोने, चांदीच्या राख्या खरेदी होत होती.

मात्र, ज्याप्रमाणात गर्दी होणे अपेक्षित होते तशी गर्दी दिसून आली नाही. चांदीच्या राख्यांना चांगली मागणी होती. मात्र, भाव अधिक असल्याने हवी तशी विक्री झाली नाही. महिला हातातील सोन्याच्या बांगड्या, कानातील डुल्स, नाकातील फुली इतर हलक्या वजनाची दागिने खरेदी करीत होत्या. मात्र, सोन्याचे भाव पाहून वजनात कमी व बजेटमधील दागिने घेत होत्या. सुवर्ण बाजारात गेल्या जुलै महिन्याच्या शेवटी सोने प्रतिदहा ग्रॅम (विना जीएसटी) १ लाख ३०० वर पोचले होते तर चांदीही प्रती किलो एक लाख 18 हजार वर पोहोचले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fact Check: ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्याच्या मागणीला तुकाराम मुंढेंचा पाठिंबा?

Maharashtra News Live Update: आमदार नारायण पाटील भाजपच्या मेळाव्यात

Fruit Juice For Diabetes: डायबिटीजचे रूग्ण फळांचा ज्यूस पिऊ शकतात का? जाणून घ्या

केसांचे आरोग्य सुधारायचे आहे? रोजच्या आहारात आजच समाविष्ट करा 'या' ५ शक्तीशाली बिया

Kalyan : धक्का लागल्यानं डोकं सटकलं, चालकावर धारदार शस्त्रानं हल्ला; कल्याणमध्ये रक्तरंजित थरार!

SCROLL FOR NEXT