Today Gold Rate: रक्षाबंधनाआधी सोनं महागलं, १० तोळ्यामागे ७६०० रुपयांची वाढ; आजचे दर किती?

Today Gold Rate 8th August 2025: सोन्याच्या दरात आज वाढ झाली आहे. सोन्याच्या दरात ७६० रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे खरेदीदारांच्या खिशाला फटका बसत आहे.
Today's Gold Rate
Today's Gold Ratesaam tv
Published On
Summary

सोन्याचे दर वाढले

प्रति तोळ्यामागे ७६० रुपयांची वाढ

ऐन सणासुदीत खरेदीदारांच्या खिशाला फटका

सोन्याच्या दरात गेल्या अनेक दिवसांपासून सातत्याने वाढ होत आहे. सोन्याच्या दरात वाढ झाल्याने सोनं खरेदी करावं की नाही हा प्रश्न पडलेला आहे. सोन्याचे दर १ लाखांपेक्षा जास्त झाले आहेत. आज सोन्याच्या दरात ७६० रुपयांनी वाढ झाली आहे. हे दर १,०३,३१० रुपयांवर पोहचले आहेत. ऐन सणासुदीच्या काळात सोन्याचे दर वाढल्याने खरेदीदारांच्या खिशाला फटका बसत आहे.

Today's Gold Rate
EPF Withdrawal Rule: आता फक्त १० वर्षात काढता येणार PF चे पूर्ण पैसे; EPFO मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

सोन्याचे दर वाढले (Gold Rate Hike)

आज २४ कॅरेट सोन्याचे दर प्रति तोळा १,०३,३१० रुपये आहेत.या दरात ७६० रुपयांनी वाढ झाली आहे. तर ८ ग्रॅम सोन्याच्या दरात ६०८ रुपयांनी वाढ झाली आहे.हे दर ८२,६४८ रुपये झाले आहेत. २२ कॅरेट सोन्याचे दर ९४,७०० रुपये प्रति तोळा आहे.या दरात ७०० रुपयांनी वाढ झाली आहे. ८ ग्रॅम सोन्याचे दर ७५,७६० रुपये आहेत. या दरात ५६० रुपयांची वाढ झाली. १० तोळा सोन्याचे दर ७००० रुपयांनी महागले आहे. हे दर ९,४७,००० रुपये झाले आहेत.

Today's Gold Rate
Types Of Gold Carat : बाजारात आलंय नवं सोनं; दागिन्याची किंमत ५० टक्क्यांनी स्वस्त, जाणून घ्या माहिती

१८ कॅरेट (18k Gold) सोन्याच्या दरात ५८० रुपयांनी वाढ झाली आहे. १० ग्रॅम सोन्याचे दर ७७,४९० रुपये झाले आहेत. ८ ग्रॅम सोन्याचे दर ६१,९९२ रुपये आहेत. या दरात ४६४ रुपयांनी वाढ झाली आहे. १० तोळा सोन्याचे दर ७,७४,९०० रुपये झाले आहेत.

आजचे चांदीचे दर (Today Silver Rate)

आज चांदीच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. ८ ग्रॅम चांदीची किंमत ९३६ रुपये आहे. १० ग्रॅम चांदीचे दर १,१७० रुपये झाले आहेत.१०० ग्रॅम चांदी ११,७०० रुपयांवर गेली आहे.

Today's Gold Rate
Gold Found: भारताच्या हृदयात सोन्याची खाण, जबलपूरच्या भूमीत लपलाय 'सोन्याचा खजिना

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com