दिल्लीतील पंतप्रधान निवासस्थानी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रक्षाबंधन साजरा केला, त्यांना ब्रम्हकुमारी दीदी यांनी राखी बांधली.
मुंबईत भाजपाच्या आयोजित रक्षाबंधनाच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लाडक्या बहिणींनी राखी बांधली.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवतीर्थ निवासस्थानी रक्षाबंधन साजरा केला. राज ठाकरेंची मोठी बहिण जयवंती देशपांडे यांनी राज ठाकरे यांना राखी बांधली.
मुंडे भाऊ-बहिण यांनी दरवर्षीप्रमाणे यंदाही एकत्रित रक्षाबंधन साजरे केले. राष्ट्रवादी कांग्रेसचे आमदार धनजंय मुंडे यांना पंकजा मुंडे आणि प्रीतम मुंडे यांनी राखी बांधली.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना सुषमा अंधारे यांनी राखी बांधली.
कांग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार यांनी देखील आपल्या बहिणीसोबत रक्षाबंधन साजरे केले.
माजी मुख्यमंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील रक्षाबंधन साजरा केला, यावेळी लाडक्या बहिणींनी त्यांना राखी बांधली.