Gold Rate Today saam tv
बिझनेस

गणेश चतुर्थीच्या दुसऱ्या दिवशी सोन्याला चकाकी; २४ कॅरेट १० तोळं सोन्याचा भाव किती? वाचा लेटेस्ट दर

Gold Price Today: गणेश चतुर्थीच्या दुसऱ्या दिवशी सोनं महागलं. २४ कॅरेट सोनं प्रति १० ग्रॅम ₹१६० रुपयांनी वाढलं. २२ कॅरेट सोनं प्रति १० ग्रॅम ₹१५० रुपयांनी वाढलं.

Bhagyashree Kamble

  • गणेश चतुर्थीच्या दुसऱ्या दिवशी सोनं महागलं.

  • २४ कॅरेट सोनं प्रति १० ग्रॅम ₹१६० रुपयांनी वाढलं.

  • २२ कॅरेट सोनं प्रति १० ग्रॅम ₹१५० रुपयांनी वाढलं.

  • ऐन सणासुदीला सोनं महागल्यामुळे ग्राहकांमध्ये नाराजी.

आज गणेश चतुर्थीचा दुसरा दिवस. सर्वत्र उत्साहाचे आणि चैतन्याचे वातावरण. गणेश चतुर्थीनिमित्त अनेक जण नवनवीन गोष्टी खरेदी करतात. तसेच काहीजण सोनंही खरेदी करतात. पण ऐन सणाच्या दिवशी सोनं महागलं आहे. गणेश चतुर्थीच्या पहिल्याच दिवशी प्रति तोळ्यामागे ३८० रूपयांनी वाढ झाली आहे. दरम्यान, आजही सोन्याचा भाव चढताच आहे. २४ कॅरेट सोन्याच्या भावात प्रति तोळ्यामागे किती रूपयांची वाढ झाली आहे, पाहुयात.

काही दिवसांत गौराईंचं आगमान होईल. गौरीसाठी आपण सोनं खरेदी करतो. परंतु सोन्याच्या दरात सातत्यानं वाढ होत असल्यामुळे सामान्यांच्या खिशाला कात्री बसली आहे. आज २८ ऑगस्ट रोजी २४ कॅरेट प्रति तोळा सोन्यामागे १६० रूपयांची वाढ झाली आहे. तर, २२ कॅरेट १० ग्रॅम सोन्यामागे १५० रूपयांची वाढ झाली आहे.

२४ कॅरेट १० ग्रॅम सोनं १६० रूपयांनी महागले असून, खरेदीसाठी आपल्याला १,०२,६०० रूपये मोजावे लागतील. तर, १०० ग्रॅम सोनं १,६०० रुपयांनी महागले असून, खरेदीसाठी आपल्याला १०,२६,००० रूपये मोजावे लागतील. ऐन सणावाराला सोनं महागल्यामुळे सामान्यांना याची झळ बसत आहे.

२२ कॅरेट १० ग्रॅम सोनं १५० रूपयांनी महागले असून, खरेदीसाठी आपल्याला ९४,०५० मोजावे लागतील. तर, १०० ग्रॅम सोनं १,५०० रूपयांनी महागले असून, खरेदीसाठी आपल्याला ९,४०,५०० रूपये मोजावे लागतील.

१८ कॅरेट १० ग्रॅम सोनं १२० रूपयांनी महागले असून, खरेदीसाठी आपल्याला ७६,९५० रूपये मोजावे लागतील. तर, १०० ग्रॅम सोनं १,२०० रूपयांनी महागले असून, खरेदीसाठी आपल्याला ७,६९,५०० रूपये मोजावे लागतील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : महापालिका निवडणुकांसाठी दोन पक्षांची युती, एकत्र लढणार, पुढच्या बैठकीत ठरणार प्लान

Maharashtra Politics: गणपती दर्शनाआधी एकनाथ शिंदे–राज ठाकरे यांची बंद दाराआड महत्त्वपूर्ण चर्चा|VIDEO

Maharashtra Live News Update: उल्हासनगरातील सामाजिक कार्यकर्त्या सरिता खानचंदानींचा आत्महत्येचा प्रयत्न

Maharashtra Government: राज्यातील शिक्षकांसाठी सरकारचा मोठा निर्णय, टप्पा अनुदानाला मंजुरी

Mithila Palkar: मिथिला पालकरच्या सौंदर्याची जादू, साडीतील फोटोंनी केले घायाळ

SCROLL FOR NEXT