Today's Gold - Silver Price Saam TV
बिझनेस

Gold Price Today: सोन्याला पुन्हा चकाकी, १० तोळे १९,१०० रुपयांनी महागले; २४ आणि २२ कॅरेटचे आजचे दर किती?

Today's Gold - Silver Price: सोनं-चांदीच्या दरात आज मोठी वाढ झाली आहे. १० तोळे १९,१०० रुपयांनी महागले आहे. आज सोनं-चांदी खरेदी करायला जाण्यापूर्वी २४, २२ आणि १८ कॅरेटचे आजचे दर किती? आहेत हे घ्या जाणून...

Priya More

Summary -

  • आज सोन्याच्या दरात मोठी वाढ झाली

  • १० तोळा सोनं १९,१०० रुपयांनी महागले

  • २४ कॅरेट १ तोळा सोन्याचा दर १,५९,२८० रुपयांवर गेले

  • चांदीच्या दरातही वाढ झाली

  • १ किलो चांदीचा दर २,७५,००० रुपये झाला

सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. आठवड्याच्या शेवटी सोन्याच्या दरात मोठी वाढ झाली आहे. सोन्यापाठोपाठ चांदीच्या दरात देखील वाढ झाली आहे. त्यामुळे सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांच्या खिशाला कात्री लागणार आहे. दर वाढल्यामुळे सोनं-चांदी खरेदी करणाऱ्या ग्राहकांमध्ये नाराजी पाहायला मिळत आहे. आज १० तोळा सोन्याच्या दरात तब्बल १९,१०० रुपयांनी वाढ झाली आहे. तर १ ग्रॅम चांदीचे दर ५ रुपयांनी वाढले आहे. आज सोनं-चांदी खरेदी करताना ग्राहकांच्या खिशावर ताण येणार आहे. सोनं-चांदी खरेदी करायला जाण्यापूर्वी आजचे १८, २२ आणि २४ कॅरेटच्या १ तोळा सोन्याचे दर आणि चांदीचे दर किती आहेत ते पाहून जा...

गुड रिटर्न्सने दिलेल्या माहितीनुसार, आज २४ कॅरेटच्या सोन्याच्या दरात मोठी वाढ झाली आहे. २४ कॅरेटचे १ तोळा सोनं १,९१० रुपयांनी महाग झाले आहे. आज २४ कॅरेटचे एक तोळा सोनं खरेदीसाठी १,५९,२८० रुपये खर्च करावे लागणार आहेत. शुक्रवारी १ तोळा सोनं १,५७,३७० रुपयांना विकले गेले. तर २४ कॅरेटचे १० तोळा सोनं तब्बल १९,१०० रुपयांनी महाग झाले आहे. हे सोनं खरेदी करण्यासाठी आज तुम्हाला १५,९२,८०० रुपये खर्च करावे लागणार आहे. गुरूवारी हेच सोनं १५,७३,७०० रुपयांना विकले गेले.

आज २२ कॅरेटच्या सोन्याच्या दरात देखील मोठी वाढ झाली आहे. २२ कॅरेटच्या १ तोळा सोन्याच्या दरामध्ये १,७५० रुपयांनी वाढ झाली आहे. हे सोनं खरेदी करण्यासाठी आज तुम्हाला १,४६,००० रुपये खर्च करावे लागणार आहे. शुक्रवारी हे सोनं १,४४,२५० रुपयांना विकले गेले. तर २२ कॅरेटचे १० तोळा सोनं १७,५०० रुपयांनी महाग झाले आहे. हे सोनं खरेदी करण्यासाठी आज तुम्हाला १४,६०,००० रुपये खर्च करावे लागणार आहेत. शुक्रवारी हे सोनं १४,४२,५०० रुपयांना विकले गेले.

२४ आणि २२ कॅरेटच्या सोन्यापाठोपाठ आज १८ कॅरेटच्या सोन्याच्या दरात देखील मोठी वाढ झाली आहे. आज १८ कॅरेटचे १ तोळा सोनं १,४३० रुपयांनी वाढले आहे. हे सोनं खरेदीसाठी आज तुम्हाला १,१९,४६० रुपये खर्च करावे लागतील. शुक्रवारी हे सोनं १,१८,०३० रुपयांना विकले गेले. तर आज १८ कॅरेटच्या १० तोळा सोन्याच्या दरामध्ये १४,३०० रुपयांची वाढ झाली. हे सोनं खरेदी करण्यासाठी आज तुम्हाला ११,९४,६०० रुपये खर्च करावे लागणार आहेत. शुक्रवारी हे सोनं ११,८०,३०० रुपयांना विकले गेले.

दरम्यान, सोन्यापाठोपाठ आज चांदीच्या दरात देखील मोठी वाढ झाली आहे. आज १ ग्रॅम चांदीच्या दरात ५ रुपयांनी वाढ झाली आहे. १ ग्रॅम चांदी खरेदीसाठी आज तुम्हाला २७५ रुपये खर्च करावे लागणार आहे. तर १ किलो चांदी तब्बल ५,००० रुपयांनी वाढली आहे. ही चांदी खरेदीसाठी आज तुम्हाला २,७५,००० रुपये खर्च करावे लागणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Heart attack symptoms: छातीत होणारी सततची जळजळ अॅसिडिटी समजू नका; ही 5 लक्षणं दिसली तर समजा हार्ट अटॅक येणारे

Maharashtra News Live Update: अमरावतीत घनकचरा वाहतुकीची १०० वाहने बेपत्ता, कोणार्क कंपनीची पोलिस ठाण्यात धाव

Mumbai : मुंबईतील शाळेत धक्कादायक प्रकार! डब्ब्यात मेथीची भाजी आणल्याने आकारला ५० रुपयांचा दंड, नेमकं प्रकरण काय?

Maharashtra Politics: मोठी बातमी! राहुल गांधींचा एक फोन अन् निर्णय बदलला, राहुल बोंद्रेचा भाजप प्रवेश अखेर रद्द

Maharashtra Weather: परतीच्या पावसाचा धुमाकूळ, मुंबईसह २४ जिल्ह्यांसाठी पुढील ३ दिवस महत्वाचे, वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा

SCROLL FOR NEXT