Today's Gold Rate saam tv
बिझनेस

Gold Rate Today: भारत-पाक तणावादरम्यान सोन्याच्या दरवाढीला ब्रेक; जाणून घ्या प्रमुख शहरातील भाव

Today's Gold Rate : सध्या भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये युद्धाची परिस्थिती निर्माण होणार असल्याचं दिसून येतंय. या परिस्थितीचा परिणाम सोनं आणि चांदीच्या दरावर झाला आहे. काय आहे आजचा दर जाणून घेऊया.

Surabhi Jayashree Jagdish

भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये तणाव वाढताना दिसतोय. याचे परिणाम सोनं आणि चांदीच्या भावावर देखील पडताना दिसतायत. आज सोन्याच्या किमतीत घसरण झाली आहे. शुक्रवारी ९ मे २०२५ रोजी एकाच दिवसात सोन्याच्या किमतीत १,२५० रुपयांपर्यंत घट झाल्याचं दिसून आलं आहे.

सध्या लग्नसराईचे दिवस सुरु आहेत आणि या काळात बाजारात मोठ्या प्रमाणात सोन्याची खरेदी केली जाते. अशातच आज २४ कॅरेट सोन्याच्या १० ग्रॅमची किंमत ९८,५०० रुपये आहे. याशिवाय २२ कॅरेट सोन्याचा दर ९०,३०० रुपये आहे. देशातील मोठ्या शहरांमध्ये सोनं आणि चांदीचे दर काय आहेत ते जाणून घ्या.

दिल्ली आणि मुंबईमध्ये कसा आहे सोन्याचा दर

आज म्हणजेच शुक्रवारी ९ मे २०२५ रोजी दिल्लीत २२ कॅरेट सोन्याचा भाव ९०,३०० रुपये आहे. तर २४ कॅरेट सोन्याचा भाव ९८,५०० रुपये प्रति १० ग्रॅम होता. मुंबईत २२ कॅरेट सोन्याचा भाव ९०,१५० रुपये आणि २४ कॅरेट सोन्याचा भाव ९८,५०० रुपये प्रति १० ग्रॅम आहे.

कसा आहे आज चांदीचा भाव?

शुक्रवारी ९ मे २०२५ रोजी चांदीचा भाव ९९,००० रुपये प्रति किलो आहे. कालच्या तुलनेत आज चांदीच्या किमतीत घसरण झाली आहे. पाहूयात देशाीतल प्रमुख शहरांमध्ये कसा आहे आजचा सोन्याचा दर.

२२ कॅरेट सोन्याचा दर

  • दिल्ली-९०,३००

  • चेन्नई-९०,१५०

  • मुंबई-९०,१५०

  • कोलकाता-९०,१५०

  • जयपूर-९०,३००

  • नोएडा-९०,३००

२४ कॅरेट सोन्याचा दर

दिल्ली-९८,५००

चेन्नई-९८,३५०

मुंबई-९८,३५०

कोलकाता-९८,३५०

जयपूर-९८,५००

नोएडा-९८,५००

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : मालाडमध्ये अग्नितांडव, १५ ते २० गाळ्यांना लागली आग

Shirdi Sai Sansthan: साई संस्थेच्या 47 अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल; शिर्डीत खळबळ, कारण काय? VIDEO

Cancer Signs: ७ लक्षणं दिसल्यास ९० दिवसांत डॉक्टरांकडे जा, कॅन्सर मूळापासून नष्ट होणार, वाचा तज्ज्ञांनी काय सांगितलं

Samruddhi Expressway Accident: समृद्धी महामार्गावर भीषण अपघात! दोन परदेशी नागरिकांचा जागीच मृत्यू|VIDEO

'बहिणीवर बलात्कार अन् आईला आयुष्य संपवण्यास प्रवृत्त', माजी मंत्र्यांवर बायकोचे खळबळजनक आरोप

SCROLL FOR NEXT