Gold- Silver Price Today Saam Tv
बिझनेस

Gold Price Today: सोन्याच्या दरात वाढ झाली की घसरण; आजचे २२ आणि २४ कॅरेटचे दर किती?

Gold- Silver Price Today: आज सोनं-चांदीच्या दरात मोठे बदल झाले आहेत. सोन्याच्या दरात कोणतिही वाढ किंवा घट झाली नाही. मात्र चांदीच्या दरात मोठी वाढ झाली आहे. सोनं-चांदी खरेदी करायला जाण्यापूर्वी वाचा आजचे दर किती?

Priya More

Summary -

  • आज सोन्याच्या दरात कोणताही बदल नाही

  • आज चांदीच्या दरात मोठी वाढ झाली

  • १८, २२, २४ कॅरेटचे दर स्थिर

  • १ ग्रॅम चांदीच्या दरात ५ रुपयांनी वाढ झाली

सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. आज सोन्याच्या दरात कोणत कोणताही बदल झाला नाही. सोन्याच्या दरात वाढ किंवा घट झाली नाही. कालच्या दरातच आज तुम्ही सोनं खरेदी करू शकता. तर आज चांदीने मात्र भाव खाल्ला आहे. आज चांदीच्या दरात मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे आज सोनं नाही तर चांदी खरेदी करताना ग्राहकांच्या खिशाला कात्री लागणार आहे. आज २४, २२ आणि १८ कॅरेटच्या सोन्याच्या दरात वाढ किंवा घट झाली नाही. तर १ ग्रॅम चांदीच्या दरात ५ रुपयांनी वाढ झाली आहे. आज सोनं-चांदी खरेदी करायला जाण्यापूर्वी आजचे १८, २२ आणि २४ कॅरेटच्या १ तोळा सोन्याचे दर किती आहेत ते जाणून घ्या...

गुड रिटर्न्सने दिलेल्या माहितीनुसार, आज २४ कॅरेटच्या १ ग्रॅम चांदीसाठी तुम्हाला १३,४१८ रुपये खर्च करावे लागतील. १ तोळा सोनं खरेदीसाठी १,३४,१८० रुपये आणि १० तोळे सोनं खरेदीसाठी आज तुम्हाला १३,४१,८०० रुपये मोजावे लागतील. शुक्रवारी देखील सोन्याचे हेच दर होते. आज २२ कॅरेटच्या सोन्याच्या दरात देखील कोणताही बदल झाला नाही. आज २२ कॅरेटच्या १ ग्रॅम सोन्याच्या खरेदीसाठी १२,३०० रुपये द्यावे लागतील. १ तोळा सोनं खरेदी करण्यासाठी आज तुम्हाला १,२३,००० रुपये खर्च करावे लागतील. तर २२ कॅरेटच्या १० तोळा सोनं खरेदी करण्यासाठी आज तुम्हाला १२,३०,००० रुपये खर्च करावे लागणार आहेत.

तर २४ आणि २२ कॅरेटच्या सोन्यासोबत १८ कॅरेटच्या सोन्याच्या दरात देखील कोणतीही वाढ किंवा घट झाली नाही. आज १८ कॅरेटचे १ ग्रॅम सोनं खरेदीसाठी १०,०६४ रुपये खर्च करावे लागतील. १० तोळा सोनं खरेदीसाठी आज तुम्हाला १,००,६४० रुपये खर्च करावे लागणार आहेत. तर आज १८ कॅरेटचे १० तोळा सोनं खरेदीसाठी आज तुम्हाला १०,०६,४०० रुपये खर्च करावे लागणार आहेत.

सोन्याच्या दरात जरी वाढ किंवा घट झाली नसली तरी देखील चांदीच्या दरात मोठी वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. आज १ ग्रॅम चांदीच्या दरात ५ रुपयांनी वाढ झाली आहे. १ ग्रॅम चांदी खरेदीसाठी आज तुम्हाला २१४ रुपये खर्च करावे लागणार आहे. तर १ किलो चांदीच्या दरामध्ये तब्बल ५,००० रुपयांनी वाढ झाली आहे. ही चांदी खरेदीसाठी आज तुम्हाला २,१४,००० रुपये खर्च करावे लागणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Heart Attack : बाहेरून फिट दिसत असलात तरी सावध! हार्ट अटॅकचा धोका वाढवू शकतात या ४ गोष्टी

Bribe Case : पुण्यात API ला २,५०,००० रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडलं, असा सापडला जाळ्यात

Smoking health risks: सिगारेट पिणाऱ्यांच्या आजूबाजूलाही फिरकू नका; वाढतो मृत्यूचा धोका

Urine Infection : पुन्हा पुन्हा युरिन इन्फेक्शन होतंय? महिलांनो! जाणून घ्या नेमकं कारण अन् टाळा 'या' चुका

Maharashtra News Live Update: OBCच्या हक्काला धक्का नाही – उदय सामंत

SCROLL FOR NEXT