

चांदीच्या दराने उच्चांक गाठला
चांदीचे दर प्रति किलोमागे २ लाख रुपये
फेडरल बँकेने व्याजदरात कपात केल्याचा परिणाम
अमेरिकन फेडरल रिझर्व्ह बँकेने व्याजदरात कपात केली आहे. व्याजदरात कपात केल्याने त्याचा थेट परिणाम सोने-चांदीवर झाला आहे. वाढती मागणी आणि व्याजदरात कपात झाल्याने चांदीच्या दराने उच्चांक गाठला आहे. चांदी २ लाख रुपये प्रति किलोवर विकली जात आहे. पहिल्यांदाच चांदीचे दर २ लाखांच्या घरात पोहचले आहेत.
मल्टी कमोडिटी मार्केट ( MCX) नुसार चांदीचे दर आज वाढले आहेत. चांदीचे दर आज प्रति किलोमागे २,००,५१० रुपयांवर विकली जात आहे. आजच्या एका दिवसात चांदीचे दर १६०० रुपयांनी वाढली आहे. चांदीसोबत सोन्याचे द गगनाला भिडले.
सोनदेखील महागलं (Gold Price Hike)
चांदीपाठोपाठा सोन्याच्या दराने उच्चांक गाठला आहे. MCX नुसार सोन्याचे दर आज २५०० रुपयांनी वाढले आहेत. प्रति तोळ्यामागे हे दर १,३४,९६६ रुपये झाले आहेत. सोन्याच्या चांदीच्या दरात खूपच वाढ झाली. अमेरिकन फेडरल बँकेने व्याजदरात कपात केली हा त्याचा परिणाम दिसत आहे. व्याजदरात कपातीमुळे शेअर मार्केटवरही परिणाम झाला आहे. जाणून घ्या डिसेंबर महिन्यात आतापर्यंत किती दर वाढले.
डिसेंबर महिन्यातील चांदीचे दर (Silver Rates in December Month)
जळगाव दिवसांपासून सोन्या-चांदीच्या किमतीत सातत्याने वाढ होत आहे. यामध्ये विशेषतः चांदीच्या दरात प्रचंड उलाढाल पाहायला मिळत आहे.आज पुन्हा दोन हजार रुपयांनी वाढ झाल्याने चांदीचे दर एक लाख ८९ हजार रुपये प्रतिकिलोवर पोहोचले आहेत. दोन दिवसांत तब्बल दहा हजार रुपयांची वाढ नोंदवली गेली आहे. तर सोन्याच्या दरातही ३०० रुपयांची वाढ झाली असून, सोन्याचा दर एक लाख २८ हजार ३०० रुपये प्रतिदहा ग्रॅम इतका झाला आहे.
डिसेंबर महिन्यात चांदीच्या दरात भाववाढ
१ डिसेंबर १,७४,०००
४ डिसेंबर १,७८,०००
८ डिसेंबर १,८१,०००
९ डिसेंबर १,७९,०००
१० डिसेंबर १,८७,०००
११ डिसेंबर १,८९,०००
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.