Gold Rate Falls Sharply
Gold Rate Falls SharplySaam

सोनं डाऊन, चांदी अप; लग्नसराईत ग्राहकांच्या खिशाला कात्री, आजचा २४ कॅरेट सोन्याचा भाव किती?

Gold Rate Falls Sharply: आज २४, २२ आणि १८ कॅरेट सोन्याच्या दरात घसरण झाली असल्याचं पाहायला मिळत आहे. दरम्यान, चांदीच्या दरात मोठी वाढ झाली आहे.
Published on

सोनं - चांदीच्या दरात वारंवार चढ उतार पाहायला मिळत आहे. सध्या लग्नसराईचा सिझन सुरू आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या भावाचा आलेख कायम चढता राहिला आहे. याचा थेट फटका ग्राहकांच्या खिशाला बसतो. मात्र, आज सोन्याच्या किमतीत कमालीची घसरण झाली असल्याचं पाहायला मिळत आहे. आज २४ कॅरेट १ तोळं सोन्याच्या दरात ११० रूपयांची घसरण झाली आहे. सोन्याच्या भावात घसरण झाली असली तरी, चांदीच्या भावात वाढ झाली आहे.

आज ११ डिसेंबर २०२५. आज सोन्याच्या भावात कमालीची घट झाली असल्याचं पाहायला मिळत आहे. २४ कॅरेट १० ग्रॅम सोन्याच्या भावात ११० रूपयांची घसरण झाली आहे. २४ कॅरेट १ तोळं सोनं खरेदीसाठी आपल्याला १,३०,२०० रूपये मोजावे लागतील. तर, २४ कॅरेट १०० ग्रॅम सोन्याच्या किमतीत १,१०० रूपयांची घसरण झाली आहे. २४ कॅरेट १० तोळं सोनं खरेदीसाठी आपल्याला १३,०२,००० रूपये मोजावे लागतील.

Gold Rate Falls Sharply
बदनामी करणे हाच काँग्रेसचा धंदा! पुण्यात मतदार यादीत फेरफार केल्याचे आरोप फेटाळत भाजपचे चोख प्रत्युत्तर

२४ कॅरेटसह २२ कॅरेट सोन्याच्या भावातही घसरण झाली आहे. २२ कॅरेट १० ग्रॅम सोन्याच्या भावात १०० रूपयांची घसरण झाली आहे. २२ कॅरेट १ तोळं सोनं खरेदीसाठी आपल्याला १,१९,३५० रूपये मोजावे लागतील. तर, २२ कॅरेट १०० ग्रॅम सोन्याच्या किमतीत १,००० रूपयांची घसरण झाली आहे. २२ कॅरेट १० तोळं सोनं खरेदीसाठी आपल्याला ११,९३,५०० रूपये मोजावे लागतील.

तर, २४, २२ सह १८ कॅरेट सोन्याच्या भावात घट झाली आहे. १८ कॅरेट १० ग्रॅम सोन्याच्या भावात ८० रूपयांची घसरण झाली आहे. १८ कॅरेट १ तोळं सोनं खरेदीसाठी आपल्याला ९७,६५० रूपये मोजावे लागतील. तर, १८ कॅरेट १०० ग्रॅम सोन्याच्या किमतीत ८०० रूपयांची घसरण झाली आहे. १८ कॅरेट १० तोळं सोनं खरेदीसाठी आपल्याला ९,७६,५०० रूपये मोजावे लागतील.

Gold Rate Falls Sharply
धुरंदर चित्रपटातील लियारी टाऊनची खरी गोष्ट; आता हे शहर कसं दिसतं? गुन्हेगारांवर आळा कसा बसला?

सोन्याच्या दरात घसरण जरी झाली असली तरी, चांदीच्या दरात वाढ झाली आहे. १ ग्रॅम चांदीच्या दरात २ रूपयांची वाढ झाली आहे. १ ग्रॅम चांदी खरेदीसाठी आपल्याला २०१ रूपये मोजावे लागतील. तर, १ किलो चांदीमागे २,००० रूपयांची वाढ झाली आहे. १ किलो चांदी खरेदीसाठी आपल्याला २,०१,००० रूपये मोजावे लागतील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com