बदनामी करणे हाच काँग्रेसचा धंदा! पुण्यात मतदार यादीत फेरफार केल्याचे आरोप फेटाळत भाजपचे चोख प्रत्युत्तर

Congress Claims BJP Altered Voter Records in Pune: पुण्यातील राजकारण तापलं. काँग्रेसने भाजपवर मतदार यादीत फेरफार केला असल्याचा गंभीर आरोप केला आहे. दरम्यान, भवानी पेठ कार्यालयातील सीसीटीव्हीत भाजप नगरसेवक दिसल्याचा दावा काँग्रेसने केला.
Congress Claims BJP Altered Voter Records in Pune
Congress Claims BJP Altered Voter Records in PuneSaam
Published On

अक्षय बडवे, साम टिव्ही

आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरात आता प्रत्येक पक्षाने हालचाली सुरू केल्या आहेत. प्रारूप मतदार यादींवर हरकतींचा पाऊस पडल्यामुळे प्रशासनाला मात्र याला तोंड देताना नाकेनऊ येईल हे मात्र नक्की. असा असतानाच आता पुणे शहरातील काँग्रेसच्या नेत्यांनी प्रारूप मतदार यादी मध्ये भाजपने सोयीप्रमाणे फेरफार केल्याचा आरोप केला आहे. काँग्रेसचे संजय बालगुडे यांनी मंगळवारी एडवोकेट असीम सरोदे यांच्या कार्यालयात एक पत्रकार परिषद घेतली.

यावेळी बोलताना संजय बालगुडे म्हणाले, ज्या निवडणुका होत आहेत त्यासाठी मतदार यादी जाहीर झाल्या आहेत त्यात घोळ झाले आहेत. सगळे कागदपत्र गुप्त ठेवावे लागतात मात्र भाजप पदाधिकाऱ्यांनी सगळ्या याद्या बदलल्या. भाजप पदाधिकारी जिथे या मतदार याद्या ठेवले आहेत तिथे जाऊन त्या मतदार याद्या चालताना आढळून आले आहेत. त्यांनी मतदार याद्या मध्ये घोळ केला आहे. ज्या रूममध्ये या प्रारूप याद्या होत्या त्या खोल्या बंद करून याद्या बदलत होते."

पत्रकार परिषदेत बालगुडे यांनी यासंदर्भात एक सीसीटीव्ही दाखवला. या सीसीटीव्ही मध्ये पुण्यातील भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयात महापालिकेच्या अधिकाऱ्यांच्या केबिनमध्ये भाजपचे नगरसेवक अजय खेडेकर आणि नामदेव माळवदे हे दोघेही उपस्थित असल्याचे स्पष्ट दिसून आलं.

Congress Claims BJP Altered Voter Records in Pune
पालकांच्यामध्ये २३ दिवसांचं बाळ झोपलं; कूस बदलली अन् बाळाचा गुदमरून मृत्यू, आईनं फोडला टाहो

"सगळे व्हिडिओ आमच्या हाती लागले आहे. त्यांच्या त्यांच्या मर्जीनुसार याद्या बदलत होते. हे सगळ CCTV मध्ये कव्हर झालं आहे. भवानी पेठेत असणाऱ्या कार्यालयात हा घोळ झाला आहे. शहरातील सर्व क्षेत्रीय कार्यालयात त्यांनी अस केलं आहे," असा आरोप बालगुडे यांनी केला.

यावर आता भाजपने हे सर्व आरोप फेटाळत ते बिनबुडाचे असल्याचं प्रत्युत्तर दिलं आहे. पुणे शहर भाजपाचे शहराध्यक्ष धीरज घाटे म्हणाले, "दिल्ली ते गल्ली पर्यंत काँग्रेसचा एकच कार्यक्रम आहे, मतदार याद्यांमध्ये गोंधळ आणि ईव्हीएम मध्ये घोटाळा दोनच विषयावर काँग्रेसचे लोक बोलत असतात. इतर कुठलेही विषय काँग्रेसकडे नाही आणि हे जनतेला आता मान्य झालं आहे.

Congress Claims BJP Altered Voter Records in Pune
'शिक्षक फक्त माझे गुरू नसून, Boyfriendही होते', वेबसिरीजच्या प्रोमोशनवेळी अभिनेत्रीकडून खुलासा

"या नगरसेवकावर हे आरोप करण्यात आले ते अजय खेडेकर यांना मी गेल्या अनेक वर्षांपासून पाहतो आहे. ते त्यांच्या प्रभागात सामान्य नागरिकांसाठी 24 तास उपलब्ध असतात. मुळात त्यांच्यावर केलेले आरोप हे बिन बुडाचे आहेत. ज्या वॉर्ड ऑफिस मध्ये हा व्हिडिओ आहे तिथला सीसीटीव्ही काँग्रेसने कायदेशीर रित्या मिळवला आहे का? मुळात वॉर्ड ऑफिसमधल्या क्षेत्रीय अधिकाऱ्याला मतदार यादी मध्ये फेरफार करायचा अधिकार आहे का? राहुल गांधी ते संजय बालगुडे यांच्यासह काळा कोट घालून वकिली करणारे वकील यांनी भाजपची सुपारी घेतली आहे," असं घाटे म्हणाले.

सीसीटीव्ही मध्ये दिसणारे भाजपाचे नगरसेवक अजय खेडेकर यांनी सुद्धा हे आरोप चुकीचा असल्याचे सांगितले. खेडेकर म्हणाले, लोक प्रतिनिधी म्हणून मी त्या भागात अनेक वर्षांपासून काम करतोय आणि तिथला मी लोकनायक आहे. सध्या काँग्रेसच्या लोकांना काही विषय नाहीत त्यामुळे ते भाजपला नुकसान पोहचवणे एवढंच काम करतात."

Congress Claims BJP Altered Voter Records in Pune
Hotel मालक अन् वेटरकडून २ तरूणांना मारहाण; कारण फक्त एवढंच..., पुण्यात नेमकं घडलं काय?

व्हिडिओमध्ये दिसणारे दुसरे माझे पैसे नगरसेवक नामदेव माळवदे यांनी सुद्धा यांच्यावर लावण्यात आलेले आरोप साफ चुकीचे असल्याचे सांगितले. ते म्हणाले "काँग्रेसकडे कुठलेच विषय नाही राहिलेत. हा व्हिडिओ पूर्णपणे चुकीचा आहे. आम्ही आमची स्थानिक काम घेऊन क्षेत्रीय कार्यालयात गेलो होतो. मतदार यादी बदलण्याचा कुठलाच उद्देश किंवा कृत्य या ठिकाणी करण्यात आलेलं नाही कारण आम्ही आमच्या स्वतःच्या प्रभागातल्या अनेक हरकती नोंदवल्या आहेत."

पालिका निवडणूक लढवण्यासाठी भाजप कार्यालयात इच्छुकांची झुंबड

आगामी महानगरपालिका लढवण्यासाठी पुणे शहराच्या भाजपाच्या मध्यवर्ती कार्यालयात इच्छुकांनी एकच गर्दी केली असल्याचं पाहायला मिळालं. यावर प्रतिक्रिया देताना शहराध्यक्ष धीरजघाटे म्हणाले "तब्बल २३०० फॉर्म जमा झाले आहेत. सामान्य माणसाला दिसत आहेत पुण्याचा विकास भाजप करणार आहे त्यामुळे इच्छुकांची मोठी गर्दी कार्यालयात आहे. मोठ्या प्रमाणावर भाजप कडून लोकं निवडून लढण्यासाठी इच्छुक आहेत. काँग्रेसचा आरोप करणे एवढाच धंदा आहे वरती केंद्रात मोदीजींना बदनाम करतात आणि तिथे आमच्यासारख्या स्थानिक नेत्यांना बदनाम करतात. त्यांच्यावर फारसं लक्ष देण्याची गरज नाही."

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com