Shruti Vilas Kadam
हलके वजन, साधी रचना आणि नाजूक डिझाइन यामुळे ऑफिस–डेली युजसाठी मिनिमल मंगळसूत्र अत्यंत लोकप्रिय आहे.
सोनेरी काळ्या मण्यांच्या साखळीवर साधे पण आकर्षक पेंडंट असलेले पारंपरिक मंगळसूत्र नेहमी ट्रेंडमध्ये राहते. लग्न आणि खास प्रसंगी याचा वापर अधिक केला जातो.
दुहेरी साखळीचे, काळ्या मण्यांसह मोठे पेंडंट असलेले हे मंगळसूत्र ट्रायल्स, नवरात्र, लग्न समारंभांसाठी अधिक आकर्षक ठरते.
आधुनिक लुकसाठी छोट्या किंवा मोठ्या डायमंड पेंडंटचा पर्याय वापरला जातो. सॉलिटेअर किंवा फ्लोरल डायमंड पॅटर्न जास्त पसंत केले जातात.
देव–देवतांच्या प्रतिमा, मोर, लक्ष्मी पॅटर्न असे पारंपरिक दक्षिण भारतीय टेंपल डिझाईन्स खास दिसतात. सण–सोहळ्यासाठी उत्तम पर्याय.
काळ्या मण्यांसोबत रंगीत मणी, मोती, किंवा गोल्ड बीड्स वापरून तयार केलेल्या डिझाईन्सना फॅशनेबल आणि युनिक लुक मिळतो.
मोठ्या पेंडंट, कुंदन, पर्ल्स किंवा जड सोन्यातील डिझाईन्स वधूसाठी खास तयार केल्या जातात. पारंपरिक आणि क्लासिक लुक देणारा हा पर्याय लग्नासाठी परफेक्ट.