Gold Rate Today: सोन्याचे दर पुन्हा वाढले, प्रति तोळा इतकी झाली वाढ, वाचा 22k अन् 24k गोल्डच्या आजच्या किंमती

18K, 22K, 24K Gold Rates Rise in India : 18 डिसेंबर 2025 रोजी सराफा बाजारात सोन्याच्या किंमतीत वाढ झाली आहे. 24, 22 आणि 18 कॅरेट सोन्यासह चांदीचे दरही मोठ्या प्रमाणात वाढले असून चांदी 2.11 लाख रुपयांच्या पुढे गेली आहे.
Gold Rate Today
Gold Rate Todaysaam tv
Published On

Gold Price Today; 18 Dec 2025 Gold Rates, 18K, 22k And 24K Gold Rate news Marathi : सात महिन्यानंतर भारतीय रूपया थोडाफार मजबूत झाला, त्याशिवाय अमेरिकन डॉलरमध्येही किंचत वाढ झाली. यामुळे आज सोन्याच्या किंमतीत मोठी घसरण होईल, असा अंदाज वर्तवला जात होतं. पण त्याउलट सोन्याच्या किंमतीमध्ये वाढ नोंदवण्यात आली आहे. गुरुवारी देशांतर्गत वायदा बाजारात सोने आणि चांदीच्या किमती कमकुवत झाल्या. पण त्याउलट देशांतर्गत सराफा बाजारात सोने आणि चांदीच्या किमतीत वाढ झाली. राजधानी दिल्लीमध्ये सोन्याने प्रति तोळा १३४,९९० रुपयांचा उच्चांक गाठलाय तर चांदीचा भाव प्रति किलो २,११,००० रुपयांवर पोहोचला आहे. बुधवारी सोने प्रति १० ग्रॅम १३४,६६० रुपयांवर आणि चांदी प्रति किलो २०७,४३५ रुपयांवर बंद झाले होते.

गुरूवारी सराफा बाजार उघडताच सोन्याच्या किंमतीमध्ये वाढ नोंदवण्यात आली. २४ कॅरेट सोन्याची किंमत प्रति ग्रॅम १३,४८४ रुपयांवर पोहचली. बुधवारच्या तुलनेत यामध्ये ३३ रूपयांची वाढ झाली. तर २२ कॅरेट सोन्याची किंमत १२,३३० प्रति ग्रॅमहून ३० रूपयांनी वाढून १२,३६० रुपये झाली. १८ कॅरेट सोन्याची किंमत आज प्रति ग्रॅम १०,११३ रुपये आहे. यामध्ये २५ रूपयांनी वाढ झाली आहे. बुधवारी या सोन्याची किंमत १०,०८८ रुपयांवर बंद झाली होती.

Gold Price Today;
Gold Price Today;goodreturns

आज भारतात प्रति १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचा भाव १,३४,९९० रुपये आहे. यामध्ये ३३० रूपयांची वाढ झाली आहे. बुधवारी २४ कॅरेट सोन्याची प्रति तोळा किंमत ₹1,34,660 रूपये इतकी होती. २२ कॅरेट सोन्याचा भाव ₹1,23,750 रुपये आहे. यामध्ये ३०० रूपयांची वाढ झाली आहे. १८ कॅरेट सोन्याची किंमत प्रतितोळा १,०१,१३० रुपये आहे. बुधवारच्या १,००,८८० मध्ये २५० रुपये जास्त आहे.

Gold Rate Today
Maharashtra politics : प्रज्ञा सातवांसह २ आमदार भाजपात प्रवेश करणार? राजकीय वर्तुळात खळबळ

सोन्यासोबतच चांदीच्या किंमतीमध्येही मोठ्या प्रमाणात वाढ नोंदवण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून चांदीच्या किंमतीतमध्ये सातत्याने वाढ होत असल्याचे दिसतेय. चांदीची किंतम प्रति किलो २ लाखांपेक्षा जास्त झाली आहे. बधवारच्या तुलनेत चांदीची किंमत गुरूवारी ३००० रूपयांनी वाढली आहे. आज चांदीची किंमत प्रति किलो २,११,००० रूपये इतकी आहे.

Gold Rate Today
Eknath Shinde : एकनाथ शिंदेंच्या भावाच्या जागेत १४५ कोटींचं ड्रग्ज सापडलं, अंधारेंचा आरोप, प्रकाश शिंदे म्हणाले....

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com