Gold Silver Price Today Saam Tv
बिझनेस

Gold Price: सोनं पुन्हा चमकलं, १० तोळे सोनं २४,००० रुपयांनी महागलं; १८, २२ अन् २४ कॅरेटचे आजचे दर किती?

Gold Silver Price Today: सोनं-चांदीच्या दरात आज मोठी वाढ झाली आहे. १० तोळे सोन्याच्या दरात २४,००० रुपयांनी वाढ झाली. तर १ ग्रॅम चांदीच्या दरात ४ रुपयांनी वाढ झाली. आज सोनं-चांदी खरेदी करायला जाण्यापूर्वी आजचे दर किती? वाचा...

Priya More

SUMMARY -

  • सलग दुसऱ्या दिवशी सोनं-चांदीच्या दरात मोठी वाढ

  • २४ कॅरेटचे १० तोळे सोनं २४ हजार रुपयांनी महागले

  • २२ आणि १८ कॅरेट सोन्याच्या दरातही मोठी वाढ झाली

  • चांदी प्रतिकिलो ४ हजार रुपयांनी महागली

सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. सोनं-चांदीच्या दरात पुन्हा मोठी वाढ झाली आहे. सलग दुसऱ्या दिवशी सोनं-चांदीने भाव खाल्ला आहे. सोन्याचे दर कमी होण्याची ग्राहक वाट पाहत होते. पण सोन्याचे दर कमी होण्याऐवजी वाढतच चालले आहेत. आज सोनं-चांदी खरेदी करताना ग्राहकांच्या खिशाला कात्री लागणार आहे. आज २४ कॅरेटच्या १ तोळा सोन्याच्या दरामध्ये २,४०० रुपयांनी वाढ झाली आहे. तर १ ग्रॅम चांदीच्या दरात ४ रुपयांनी वाढ झाली आहे. आज जर तुम्ही सोनं-चांदी खरेदी करण्यासाठी जाणार असाल तर आजचे १८, २२ आणि २४ कॅरेटच्या १ तोळा सोन्याचे दर आणि चांदीचे दर किती आहेत ते जाणून घ्या...

गुड रिटर्न्सने दिलेल्या माहितीनुसार, आज २४ कॅरेटच्या सोन्याच्या दरात मोठी वाढ झाली आहे. २४ कॅरेटच्या १ तोळा सोन्याच्या दरात २,४०० रुपयांनी वाढ झाली आहे. २४ कॅरेटचे एक तोळा सोनं खरेदीसाठी आज तुम्हाला १,३८,५५० रुपये खर्च करावे लागणार आहेत. तर २४ कॅरेटच्या १० तोळा सोन्याच्या दरामध्ये तब्बल २४,००० रुपयांनी वाढ झाली आहे. हे सोनं खरेदी करण्यासाठी आज तुम्हाला १३,८५,५०० रुपये खर्च करावे लागणार आहेत.

आज २२ कॅरेटच्या सोन्याच्या दरात देखील मोठी वाढ झाली आहे. २२ कॅरेटच्या १ तोळा सोन्याच्या दरामध्ये २,२०० रुपयांनी वाढ झाली आहे. हे सोनं खरेदी करण्यासाठी आज तुम्हाला १,२७,००० रुपये खर्च करावे लागणार आहे. तर २२ कॅरेटच्या १० तोळा सोन्याच्या दरामध्ये तब्बल २२,००० रुपयांची वाढ झाली आहे. हे सोनं खरेदी करण्यासाठी आज तुम्हाला १२,७०,००० रुपये खर्च करावे लागणार आहेत. सोन्याचे दागिने २२ कॅरेटमध्ये बनवले जातात. त्यामुळे जात जर तुम्ही दागिने खरेदी करण्यासाठी जाणार असाल तर तुमच्या खिशाला मोठा फटका बसेल.

तर २४ आणि २२ कॅरेटच्या सोन्यापाठोपाठ आज १८ कॅरेटच्या सोन्याच्या दरात देखील मोठी वाढ झाली आहे. आज १८ कॅरेटच्या १ तोळा सोन्याच्या दरात १,८०० रुपयांनी वाढ झाली आहे. हे सोनं खरेदीसाठी आज तुम्हाला १,०२,११० रुपये खर्च करावे लागतील. तर आज १८ कॅरेटच्या १० तोळा सोन्याच्या दरामध्ये १८,००० रुपयांनी वाढ झाली आहे. हे सोनं खरेदीसाठी आज तुम्हाला १०,३९,१०० रुपये खर्च करावे लागणार आहेत. सोमवारी हेच सोनं १०,२१,१०० रुपयांना विकले गेले होते.

दरम्यान, सोन्यापाठोपाठ चांदीने देखील भाव खाल्ला. चांदीच्या दरात आज मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे आज सोन्यासोबत चांदी खरेदी करताना तुमच्या खिशावर ताण येणार आहे. आज १ ग्रॅम चांदीच्या दरात ४ रुपयांनी वाढ झाली आहे. १ ग्रॅम चांदी खरेदीसाठी आज तुम्हाला २२३ रुपये खर्च करावे लागणार आहे. तर १ किलो चांदीच्या दरामध्ये तब्बल ४,००० रुपयांनी वाढ झाली आहे. ही चांदी खरेदीसाठी आज तुम्हाला २,२३,००० रुपये खर्च करावे लागणार आहे. त्यामुळे आज चांदी खरेदी करण्यासाठी तुम्हाला जास्त खर्च करावा लागेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sayali Sanjeev: दिसतीया भारी, नेसूनी साडी, काळजाचं पाणी पाणी करतीया पोर ही

Maharashtra Live News Update: पुण्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढणार

MNS-Shivsena Alliance: मोठी बातमी! मनसे-शिवसेना युतीवर शिक्कामोर्तब, संजय राऊतांनी तारीख अन् वेळ सांगितली

Navi Mumbai : रुग्णवाहिकेचा चालक जेवणासाठी गेला, वाशी रेल्वे स्थानकात तरुणाचा मृत्यू, नेमकं काय झालं?

Orange Peel Homemade Serum : थांबा! संत्र्याची साल फेकू नका, 'असे' तयार करा त्वचा चमकवणारे सीरम

SCROLL FOR NEXT