Manasvi Choudhary
सोन्याच्या दुकानातून दागिने विकत घेतल्यानंतर सोनार ते गुलाबी रंगाच्या कागदात गुडांळून देताना तुम्ही देखील पाहिलेच असती. मात्र तुम्हाला माहितीये का सोन्याचे दागिने गुलाबी रंगाच्या कागदात का गुंडाळतात.
सोन्याचे दागिने गुलाबी कागदात गुंडाळण्याचे कारण नेमके काय आहे हे आज आपण जाणून घेऊया.
गुलाबी कागदात किंचित धातूची चमक असते यामुळे गुलाबी कागदात सोने ठेवल्याने त्याची चमक टिकून राहते.
गुलाबी रंगाला शुभ आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते यामुळे गुलाबी रंगाच्या कागदात सोन्याचे दागिने ठेवतात.
सोने हा नाजूक धातू आहे जर दागिने एकमेकांना घासले गेले तर ते तुटू शकतात यामुळे सोन्याचे दागिने गुलाबी कागदात ठेवतात.
घरामध्ये दागिने कपाटात किंवा लॉकरमध्ये ठेवलेले असतात. गुलाबी रंगाचा कागद लांबूनही चटकन नजरेस पडतो, ज्यामुळे घाईच्या वेळी दागिने शोधणे सोपे जाते.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारि आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.