Manasvi Choudhary
नवरीचा सर्वात महत्वाचा श्रृगांर म्हणजे हिरवा चुडा. लग्नाआधी नवरीच्या हातात हिरवा चुडा भरण्याची जुनी परंपरा आहे.
पूर्वी पासून हिरव्या काचेच्या बांगड्या नवरीसाठी शुभ मानल्या जात आहेत. आता या काचेच्या बांगड्यामध्ये नवनवीन डिझाईन्स आले आहेत.
काचेच्या हिरव्या बांगड्या हा सर्वात जुना पारंपारिक श्रृगांर आहे. साध्या प्लेन हिरव्या बांगड्या ज्यांना हिरवा चुडा असे म्हणतात.
ज्यांना जास्त चमक आवडत नाही अश्यामध्ये मॅट फिनीश हिरव्या बांगड्या मिळतात या तुम्ही डेली वेअरसाठी वापरू शकता.
मखमली हिरव्या बांगड्या यांचा रंग अत्यंत गडद आणि उठाव असतो या बांगड्या तुम्हाला कोणत्याही साडीवर शोभून दिसतील.
लाख किंवा लाहच्या बांगड्या जड आणि जाड असतात. यावर काचेचे तुकडे किंवा मणी बसवलेले असतात.