Manasvi Choudhary
महिलांची शरीरयष्टी जाड असो किंवा बारिक असली तरी योग्य ब्लाऊजचे डिझाईन तुमचा लूक आकर्षक आणि प्रभावी दाखवू शकतो.
शरीरयष्टीनुसार परफेक्ट ब्लाऊज कसा निवडायचा हे या वेबस्टोरीतून आज जाणून घेऊया.
ब्लाऊजच्या गळ्याची डिझाईन 'V' किंवा 'U' नेक असल्यास तुमची शरीरयष्टी बारीक दिसते.
शरीराने बारीक असणाऱ्या महिलांसाठी पॅडेड ब्लाऊज हा पर्याय भारी आहे. यामुळे तुमचा लूक परफेक्ट फिटींगमध्ये दिसतो.
शरीराने जाड असणाऱ्या महिलांना जॉर्जेट, शिफॉन किंवा क्रेप यांसारखे अंगाला चिकटून बसणारे कापड वापरावे. कडक सिल्क किंवा खूप जड काठ असलेले ब्लाऊज घालू नये.
कंबर बारीक असल्यास स्वीटहार्ट नेक आणि स्लिम फिटेड स्लीव्हज ब्लाऊज ट्राय करा यामुळे तुमचा लूक सुंदर दिसेल.
ज्या महिलांचे खांदे रुंद आणि पोटाचा भाग थोडा जड आहे अश्या महिलांना v नेक आणि गोळ गळ्याचे ब्लाऊज निवडा