Gold Rate Today Saam tv
बिझनेस

Gold Price Today: सोन्याच्या दरात आज वाढ झाली की घट? जाणून घ्या २२ आणि २४ कॅरेटचे दर

Gold- Silver Price: सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी दिलासा देणारी बातमी आहे. सोन्याच्या दरात आज काहीच वाढ झाली नाही. तर चांदीच्या दरात काहीशी घसरण झाली आहे. आजचे २२ आणि २४ कॅरेटचे सोन्याचे दर किती घ्या जाणून...

Priya More

Summary -

  • आज २४ आणि २२ कॅरेट सोन्याच्या दरात कोणताही बदल नाही.

  • आज सोन्याचे दर स्थिर राहिले आहेत. खरेदी करण्याची चांगली संधी आहे.

  • २४ कॅरेट सोन्याचा दर १,१०,५०९ रुपये प्रति तोळा आहे.

  • चांदीच्या दरात १०० रुपयांनी घट झाली असून १ किलो चांदीचा दर १,२९,००० रुपये झाली आहे.

सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरामध्ये सतत वाढ होत आहे. सोनं खरेदी करणाऱ्यांना आज काहीसा दिलासा मिळाला आहे. सोन्याच्या दरामध्ये आज कोणताही बदल झाला नाही. सोन्याचे दर कालच्या इतकेच आहेत. त्यामुळे सोनं खरेदी करण्याची आज चांगली संधी आहे. आज २४ कॅरेटच्या एक तोळा सोन्याचे दर १,१०,५०९ रुपये इतकी आहे. तर आज चांदीच्या दरामध्ये घसरण झाली आहे. सोनं आणि चांदी खरेदी करायला जाण्यापूर्वी आजचे दर किती आहेत ते घ्या जाणून...

गुड रिटर्न्स या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, सोन्याच्या २४, २२ आणि १८ कॅरेटच्या दरात आज कोणतीही वाढ झाली आहे. बुधवारी याच सोन्याच्या दरात २१९ रुपयांनी वाढ झाली होती. आज २४ कॅरेटचे १ तोळा सोनं खरेदी करण्यासाठी आज तुम्हाला १,१०,५०९ रुपये मोजावे लागणार आहेत. २४ कॅरेटचे १० तोळा सोनं खरेदी करण्यासाठी तुम्हाला आज ११,०५,०९० रुपये द्यावे लागणार आहेत.

आज २२ कॅरेट सोन्याच्या दरात देखील काहीच वाढ झाली नाही. बुधवारी याच सोन्याच्या दरात २०० रुपयांनी वाढ झाली होती. आज २२ कॅरेटचे १ तोळा सोनं खरेदी करण्यासाठी १,०१,३०० रुपये मोजावे लागणार आहेत. तर २२ कॅरेटचे १० तोळा सोनं खरेदीसाठी तुम्हाला १०,१३,००० रुपये द्यावे लागणार आहेत.

त्याचसोबत, आज १८ कॅरेटच्या सोन्याच्या दरात देखील काहीच बदल झाला नाही. आज १८ कॅरेटचे १ तोळा सोनं खरेदीसाठी ८२,८८० रुपये मोजावे लागणार आहे. तर १० तोळा सोनं खरेदीसाठी ८,२८,८०० रुपये द्यावे लागणार आहेत. बुधवारी १८ कॅरेच्या १ तोळा सोन्याच्या दरामध्ये १६० रुपयांनी वाढ झाली होती.

दरम्यान, आज चांदीच्या दरात काहीशी घसरण झाली आहे. आज १ ग्रॅम चांदी खरेदीसाठी तुम्हाला १२९ रुपये मोजावे लागणार आहेत. तर १ किलो चांदीच्या दरामध्ये १०० रुपयांनी घट झाली आही. ही चांदी खरेदीसाठी तुम्हाला १,२९,००० रुपये द्यावे लागतील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Extramarital Affair : अमेरिकेत पत्नीची हत्या, भारतातील गर्लफ्रेंडला फोटो; उच्चशिक्षित इंजिनिअरचं भयानक कृत्य

Smartphone Care Tips : फोनच्या स्क्रीनवर Liquid Detected चा इशारा येतो? मग टाळा या ७ चुका

Maharashtra News Live Update: पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांच्या ताफ्याला रस्त्यावर पडलेल्या खड्यांचा बसला फटका

शोल्डर बॅग्सच्या 5 लेटेस्ट डिझाईन्स; प्रत्येक आउटफिटला देतील स्टायलिश लूक

आदिवासी महिलेसोबत सामूहिक बलात्कार; नवऱ्याला शोधायला गेली अन् शेतात सापडला मृतदेह

SCROLL FOR NEXT