Saibaba Silver Coin : साईबाबांच्या ९ चांदीच्या नाण्यांवरून वाद; दोन परिवारांकडून दावे प्रतिदावे, साईभक्तांमध्ये संभ्रम

Shirdi Saibaba News : साईबाबांनी त्यांच्या भक्त लक्ष्मीबाई शिंदे यांना चांदीचे कॉइन दिले होते. मात्र लक्ष्मीबाई यांचे निधन झाल्यानंतर चांदीचे कॉइन नेमके कोणाकडे यावरून वाद निर्माण झाला
Saibaba Silver Coin
Saibaba Silver CoinSaam tv
Published On

सचिन बनसोडे 

शिर्डी (अहिल्यानगर) : शिर्डीच्या साईबाबांनी आपल्या अखेरच्या क्षणी त्यांच्या सेवेतील निस्सीम भक्त लक्ष्मीबाई शिंदे यांना चांदीची ९ नाणी भेट दिली होती. हीच नाणी आता वादाचे केंद्र ठरले आहेत. लक्ष्मीबाई शिंदे यांच्या मुलाकडील आणि मुलीकडील वंशजांनी ९ नाण्यांवर आपला हक्क सांगितल्याने वादाला तोंड फुटले आहे. या वादामुळे साईभक्तांमध्ये मात्र ९ नाण्यांबद्दल मोठा संभ्रम निर्माण झाला आहे. 

१९१८ साली विजयादशमीच्या दिवशी साईबाबांचे महानिर्वाण झाले. अखेरच्या समयी साईबाबांना नित्यनियमाने भोजन आणि सेवा देणाऱ्या त्यांच्या त्यावेळच्या साईभक्त लक्ष्मीबाई शिंदे यांना साईबाबांनी चांदीचे ९ नाणी भेट दिली होती. हीच ९ नाणी कालांतराने साईभक्तांच्या आस्थेचे केंद्र बनले. मात्र आता लक्ष्मीबाई शिंदे यांचे मुलाकडील वंशज चंद्रकांत शिंदे आणि त्यांचे नातेवाईक ही चांदीची नाणी आमच्याकडे असल्याचा दावा करत आहेत. तर लक्ष्मीबाई शिंदे यांची मुलगी सोनबाई यांच्या वंशज असलेल्या शैलेजा गायकवाड आणि त्यांचे कुटूंबीय ती चांदीची ९ नाणी आमच्याकडे असल्याचा दावा करत आहेत. 

Saibaba Silver Coin
Bhandara : शाळेत जाताना विद्यार्थिनीवर काळाची झडप; चिखलात सायकल स्लिप होताच ट्रॅक्टरची धडक, विद्यार्थिनीचा जागीच मृत्यू

साईबाबांनी दिलेली चांदीची नऊ नाणी ही एक ऐतिहासिक, भक्तिपर आणि भावनिक ठेव आहे. मात्र, सध्या या नाण्यांवरून शिर्डीत मोठा वाद सुरू आहे. साईभक्त लक्ष्मीबाई शिंदे ट्रस्टचे अध्यक्ष अरुण गायकवाड आणि त्यांच्या मातोश्री शैलजा गायकवाड यांनी सहाय्यक धर्मादाय आयुक्तांचा चौकशी अहवाल पत्रकार परिषदेत मांडल्याने पुन्हा हा वाद चव्हाट्यावर आला आहे.

Saibaba Silver Coin
Akola : अकोल्यातील जवान नितेश घाटे यांना अयोध्येत वीरमरण; कर्तव्यावर असताना दुर्दैवी घडलं

लक्ष्मीबाई शिंदे ट्रस्टकडून गायकवाड यांच्यावर करण्यात आला आरोप 

मात्र आजघडीला या ९ नाण्यांचे १८ नाणे झाल्याने मोठा वाद निर्माण झाला होता. त्यानंतर संजय शिंदे, चंद्रकांत शिंदे यांनी २०२२ साली साईबाबा संस्थान आणि पोलिस प्रशासनाकडे तक्रार दाखल केली होती. अरुण गायकवाड हे लक्ष्मीबाई शिंदे ट्रस्ट आणि ९ नाणी भाविकांना दाखवुन मोठ्या देणग्या जमा करत असल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला होता. धर्मादाय आयुक्तांच्या चौकशी अहवालात देणगीचा तपशील आणि विनीयोग तसेच नऊ नाणी ही अरुण गायकवाड अध्यक्ष असलेल्या ट्रस्टकडे असल्याचे निरीक्षण नोंदवल्याचे अरुण गायकवाड यांनी म्हटले आहे. 

त्या चौकशी अहवाल विरोधात दाद मागणार 
लक्ष्मीबाई शिंदेंचे आम्ही वंशज आहोत. त्यामुळे वारसाहक्काने ती चांदीची नाणी आमच्याकडे असुन ती लक्ष्मीबाईंच्या नात शैलेजा गायकवाड यांचेकडे कसे येतील? असा प्रश्न मुलाकडील वंशजांनी उपस्थित केला. आजही साईबाबांनी लक्ष्मीबाई शिंदेंना दिलेली नाणी हि जुन्या घरी असलेल्या मंदिरातच आहेत आणि तीच खरी आहेत. धर्मादाय आयुक्तांनी सुनावणी घेताना आम्हाला तारखेला हजर राहाण्याची सूचना किंवा समन्स दिले नाही. त्यांनी दिलेल्या चौकशी अहवाल विरोधात दाद मागणार असल्याचे यावेळी तक्रारदार संजय शिंदे आणि चंद्रकांत शिंदे यांनी म्हटले आहे. सर्व नाण्यांची पुरातत्व विभागाकडून सत्यता तपासुन दुध का दुध आणि पाणी का पाणी व्हाव, अशी मागणी तक्रारदारांनी केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com