Gold- Silver Price Today Saam Tv
बिझनेस

Gold Price Today: नववर्षाच्या पहिल्या दिवशी सोन्याच्या दरात वाढ झाली की घसरण? २२ आणि २४ कॅरेटचे आजचे दर किती?

Gold- Silver Price Today: सोनं- चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. नववर्षाच्या पहिल्याच दिवशी सोन्याच्या दरात मोठी वाढ झाली तर चांदीच्या दरात काही प्रमाणात घसरण झाली. आज सोनं-चांदीचे दर किती वाचा सविस्तर...

Priya More

Summary -

  • नववर्षाच्या पहिल्या दिवशी सोन्याच्या दरात वाढ झाली आहे

  • २४ कॅरेट सोन्याच्या १ तोळा दरात १७० रुपयांची वाढ झाली

  • २२ आणि १८ कॅरेट सोन्याचे दरही वाढले

  • चांदीच्या दरात आज काही प्रमाणात घसरण झाली

नवीन वर्षाचे देशभरात सर्वांनी जल्लोषात स्वागत केले. नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी अनेक नियमांमध्ये मोठे बदल झाले. गॅस सिलिंडरचे दर वाढले. सोनं-चांदीच्या दराबाबत देखील आज मोठी अपडेट समोर आली आहे. नववर्षाच्या पहिल्या दिवशी सोन्याच्या दरात मोठी वाढ झाली तर चांदीच्या दरात काही प्रमाणात घसरण झाली. आज २४ कॅरेटच्या १ तोळा सोन्याच्या दरामध्ये १७० रुपयांनी वाढ झाली आहे. तर १ ग्रॅम चांदीच्या दरात १ रुपयांनी घसरण झाली आहे. सोन्याच्या दरात वाढ झाल्यामुळे आज नवर्षाच्या पहिल्याच दिवशी सोनं खरेदी करणाऱ्यांच्या खिशाला कात्री लागणार आहे. आज जर तुम्ही सोनं-चांदी खरेदी करण्यासाठी जाणार असाल तर आजचे १८, २२ आणि २४ कॅरेटच्या १ तोळा सोन्याचे दर आणि चांदीचे दर किती आहेत ते जाणून घ्या...

गुड रिटर्न्सने दिलेल्या माहितीनुसार, आज २४ कॅरेटच्या सोन्याच्या दरात मोठी वाढ झाली आहे. २४ कॅरेटच्या १ तोळा सोन्याच्या दरात १७० रुपयांनी वाढ झाली आहे. २४ कॅरेटचे एक तोळा सोनं खरेदीसाठी आज तुम्हाला १,३५,०६० रुपये खर्च करावे लागणार आहेत. तर २४ कॅरेटच्या १० तोळा सोन्याच्या दरात १७०० रुपयांनी वाढ झाली आहे. हे सोनं खरेदी करण्यासाठी आज तुम्हाला १३,५०,६०० रुपये खर्च करावे लागणार आहेत.

आज २२ कॅरेटच्या सोन्याच्या दरात देखील वाढ झाली आहे. २२ कॅरेटच्या १ तोळा सोन्याच्या दरामध्ये १५० रुपयांनी वाढ झाली आहे. हे सोनं खरेदी करण्यासाठी आज तुम्हाला १,२३,८०० रुपये खर्च करावे लागणार आहे. तर २२ कॅरेटचे १० तोळा सोन्याच्या दरामध्ये १,५०० रुपयांनी वाढ झाली आहे. हे सोनं खरेदी करण्यासाठी आज तुम्हाला १२,३८,००० रुपये खर्च करावे लागणार आहेत.

तर २४ आणि २२ कॅरेटच्या सोन्यापाठोपाठ आज १८ कॅरेटच्या सोन्याच्या दरात देखील वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. आज १८ कॅरेटच्या १ तोळा सोन्याच्या दरात १२० रुपयांनी वाढ झाली आहे. हे सोनं खरेदीसाठी आज तुम्हाला १,०१,२९० रुपये खर्च करावे लागतील. तर आज १८ कॅरेटचे १० तोळा सोन्याच्या दरामध्ये १,२०० रुपयांनी वाढ झाली आहे. हे सोनं खरेदीसाठी आज तुम्हाला १०,१२,९०० रुपये खर्च करावे लागणार आहेत.

दरम्यान, सोन्याच्या दरात वाढ झाली असली तरी आज चांदीच्या दरात काही प्रमाणात घसरण झाली आहे. आज १ ग्रॅम चांदीच्या दरात १ रुपयांनी घसरण झाली आहे. १ ग्रॅम चांदी खरेदीसाठी आज तुम्हाला २३८ रुपये खर्च करावे लागणार आहे. तर १ किलो चांदी तब्बल १,००० रुपयांनी स्वस्त झाली आहे. ही चांदी खरेदीसाठी आज तुम्हाला २,३८,००० रुपये खर्च करावे लागणार आहे. त्यामुळे आज चांदी खरेदी करताना तुमच्या खिशाला कात्री लागणार नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मित्रानेच खुपसला भारताच्या पाठीत खंजीर, भारतीय तेल टँकरवर इराणची फायरिंग

Bigg Boss Marathi 6 Grand Finale : बिग बॉस मराठीच्या घरातील 'रणरागिणी' चा पत्ता कट; शेवटच्या क्षणी बाजी पलटली | VIDEO

अमेरिका इराण युद्ध पुन्हा भडकणार? होर्मुझवरुन इराणचा अमेरिकेला इशारा

TCS धर्मांतर प्रकरणानंतर मुंबईतही धक्कादायक प्रकार; प्रेमाच्या बहाण्याने १६ वर्षीय तरुणीला पळवलं

Maharashtra News Live Update: नांदेड जिल्ह्यात काही ठिकाणी आवकाळी पाऊस

SCROLL FOR NEXT