Gold- Silver Price Today Saam tv
बिझनेस

Gold Price Today: सोन्याच्या दरात पुन्हा वाढ, १० तोळे सोनं ७१०० रुपयांनी वाढले, २२ -२४ कॅरेटचा आजचा भाव किती?

Gold- Silver Price Today: सोनं-चांदीच्या दराबाबत महत्वाची अपडेट समोर आली आहे. आज सोन्याच्या दरात मोठी वाढ झाली. तर चांदीचे दर घसरले आहेत. सोनं-चांदी खरेदी करायला जाण्यापूर्वी आजचे दर किती? ते घ्या जाणून...

Priya More

Summary:

  • सोनं-चांदीच्या दरात मोठी अपडेट

  • आज सोन्याच्या दरात मोठी वाढ झाली

  • १ तोळा सोन्याच्या दरात ७१० रुपयांनी वाढ

  • १ ग्रॅम चांदी ३ रुपयांनी झाली स्वस्त

सोनं-चांदीच्या दरात गुरूवारी मोठी घट झाली होती. पण आज पुन्हा सोन्याच्या दरात वाढ झाली. तर चांदीच्या दरात घट झाली. त्यामुळे आज सोनं खरेदी करताना ग्राहकांच्या खिशाला कात्री लागणार आहे. आज २४ कॅरेटच्या १ तोळा सोन्याच्या दरामध्ये ७१० रुपयांनी वाढ झाली आहे. तर १ ग्रॅम चांदीचे दर ३ रुपयांनी घसरले. आज जर तुम्ही सोनं-चांदी खरेदी करण्यासाठी जाणार असाल तर आजचे १८, २२ आणि २४ कॅरेटच्या १ तोळा सोन्याचे दर आणि चांदीचे दर किती आहेत ते वाचून जा...

गुड रिटर्न्सने दिलेल्या माहितीनुसार, आज २४ कॅरेटच्या सोन्याच्या दरात मोठी वाढ झाली आहे. २४ कॅरेटच्या १ तोळा सोन्याच्या दरात ७१० रुपयांनी वाढ झाली आहे. २४ कॅरेटचे एक तोळा सोनं खरेदीसाठी आज तुम्हाला १,३८,७१० रुपये खर्च करावे लागणार आहेत. तर २४ कॅरेटच्या १० तोळा सोन्याच्या दरात तब्बल ७,१०० रुपयांनी वाढ झाली आहे. हे सोनं खरेदी करण्यासाठी आज तुम्हाला १३,८७,१०० रुपये खर्च करावे लागणार आहेत.

आज २४ कॅरेटसोबत २२ कॅरेटच्या सोन्याच्या दरात देखील मोठी वाढ झाली आहे. २२ कॅरेटच्या १ तोळा सोन्याच्या दरामध्ये ६५० रुपयांनी वाढ झाली आहे. हे सोनं खरेदी करण्यासाठी आज तुम्हाला १,२७,१५० रुपये खर्च करावे लागणार आहे. तर २२ कॅरेटच्या १० तोळा सोन्याच्या दरामध्ये ६,५०० रुपयांनी वाढ झाली आहे. हे सोनं खरेदी करण्यासाठी आज तुम्हाला १२,७१,५०० रुपये खर्च करावे लागणार आहेत.

तर २४ आणि २२ कॅरेटच्या सोन्यापाठोपाठ आज १८ कॅरेटच्या सोन्याच्या दरात देखील मोठी वाढ झाली आहे. आज १८ कॅरेटच्या १ तोळा सोन्याच्या दरात ५३० रुपयांनी वाढ झाली आहे. हे सोनं खरेदीसाठी आज तुम्हाला १,०४,०३० रुपये खर्च करावे लागतील. तर आज १८ कॅरेटचे १० तोळा सोन्याच्या दरामध्ये ५,३०० रुपयांनी वाढ झाली आहे. हे सोनं खरेदीसाठी आज तुम्हाला १०,४०,३०० रुपये खर्च करावे लागणार आहेत. आज सोनं खरेदी करताना तुमच्या खिशाला चांगलीच कात्री लागणार आहे.

दरम्यान, सोन्याच्या दरात आज वाढ झाली असली तरी आज चांदीच्या दरात घसरण झाली आहे. त्यामुळे ग्राहकांना काहीसा दिलासा मिळाला. आज १ ग्रॅम चांदीच्या दरात ३ रुपयांनी घसरण झाली आहे. १ ग्रॅम चांदी खरेदीसाठी आज तुम्हाला २४९ रुपये खर्च करावे लागणार आहे. तर १ किलो चांदीच्या दरात तब्बल ३,००० रुपयांनी घसरण झाली आहे. ही चांदी खरेदीसाठी आज तुम्हाला २,४९,००० रुपये खर्च करावे लागणार आहे. त्यामुळे आज चांदी खरेदी करण्याची चांगली संधी आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pollution Alarm: पुणेकरांच्या फुफ्फुसात विषारी धूळ; हवेत दर तासाला मिसळलं जातंय 6 टन सिमेंट

EPFO चा ऐतिहासिक निर्णय; आता UPI द्वारे पीएफ काढता येणार?

husband wife clash : पतीचा फोन हिसकवाल तर जेलमध्ये जाल? तक्रार केल्यास 3 वर्षांची शिक्षा, दंडही लागणार?

Maharashtra Politics: काँग्रेस-हिंदुत्ववादी रस्त्यावर भिडले; काँग्रेस प्रवक्त्यावर हल्ला,राजकारणाचा कल्ला

राज्यसभेसाठी महायुतीच्या उमेदवारांच्या नावांचा सस्पेन्स संपला? आठवलेंचं नाव निश्चित, भाजपकडून ३ जागांवर कुणाला संधी मिळणार?

SCROLL FOR NEXT