Gold Price Today  saam tv
बिझनेस

Gold Price: सलग तिसऱ्या दिवशी सोन्याचे दर घसरले, १० तोळा ९७०० रुपयांनी स्वस्त; वाचा तुमच्या शहरातील आजचे भाव

Gold Price Falls for Third Straight Day: सोनं खरेदी करण्याची आज सुवर्णसंधी आहे. सोन्याच्या दरामध्ये सलग तिसऱ्या दिवशी मोठी घसरण झाली. १० तोळा ९७०० रुपयांनी स्वस्त झालं. वाचा आजचे दर किती?

Priya More

Summary -

  • सलग तिसऱ्या दिवशी सोन्याच्या दरात मोठी घसरण

  • १० तोळा सोनं ९,८०० रुपयांनी स्वस्त

  • २४, २२ आणि १८ कॅरेट सोन्याच्या दरात मोठी घसरण

  • मुंबई, पुणे, दिल्लीसह प्रमुख शहरांमध्येही दरात घट झाली

सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. सराफा बाजार उघडताच सोन्याच्या दरामध्ये मोठी घसरण झाली. सलग तिसऱ्या दिवशी सोनं स्वस्त झाल्यामुळे ग्राहकांना दिलासा मिळाला. इराण-इस्राइलमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे सोन्याच्या दरामध्ये वाढ होणार असल्याचे म्हटले जात होते. पण सोन्याचे दर कमी होत असल्यामुळे ग्राहकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. आज १० तोळा सोन्याच्या दरामध्ये ९,८०० रुपयांनी घसरण झाली. आज सोनं खरेदी करायला जाण्यापूर्वी तुम्ही १८, २२ आणि २४ कॅरेटच्या १ तोळा सोन्याचे दर किती आहेत ते वाचून जा...

गुड रिटर्न्सने दिलेल्या माहितीनुसार, २४ कॅरेटच्या सोन्याच्या दरामध्ये सलग तिसऱ्या दिवशी घसरण झाली. २४ कॅरेटच्या १ तोळा सोन्याचे दर ९८० रुपयांनी स्वस्त झाले आहे. आज २४ कॅरेटचे एक तोळा सोनं खरेदीसाठी १,६३,५३० रुपये खर्च करावे लागणार आहेत. तर २४ कॅरेटचे १० तोळा सोनं ९,८०० रुपयांनी स्वस्त झाले आहे. हे सोनं खरेदी करण्यासाठी आज तुम्हाला १६,३५,३०० रुपये खर्च करावे लागणार आहे.

आज २२ कॅरेटच्या सोन्याच्या दरात देखील मोठी घसरण झाली आहे. २२ कॅरेटच्या १ तोळा सोन्याच्या दरामध्ये ९०० रुपयांनी घसरण झाली. हे सोनं खरेदी करण्यासाठी आज तुम्हाला १,४९,९०० रुपये खर्च करावे लागणार आहे. तर २२ कॅरेटच्या १० तोळा सोन्याच्या दरामध्ये ९,००० रुपयांनी घसरण झाली आहे. हे सोनं खरेदी करण्यासाठी आज तुम्हाला १४,९९,००० रुपये खर्च करावे लागणार आहेत.

२४ आणि २२ कॅरेटच्या सोन्यापाठोपाठ आज १८ कॅरेटच्या सोन्याच्या दरात देखील मोठी घसरण झाली आहे. आज १८ कॅरेटच्या १ तोळा सोन्याच्या दरामध्ये ७३० रुपयांनी घसरण झाली आहे. हे सोनं खरेदीसाठी आज तुम्हाला १,२७२,६५० रुपये खर्च करावे लागतील. तर आज १८ कॅरेटच्या १० तोळा सोन्याच्या दरामध्ये ७,३०० रुपयांनी घसरण झाली आहे. हे सोनं खरेदी करण्यासाठी आज तुम्हाला १२,२६,५०० रुपये खर्च करावे लागणार आहेत.

२४ कॅरेटच्या १ तोळा सोन्याचे तुमच्या शहरातील आजचे दर किती?

मुंबई - १६,३५३ रुपये

पुणे - १६,३५३ रुपये

चेन्नई - १६,४९५ रुपये

बंगळुरू - १६,३५३ रुपये

दिल्ली - १६,३६८ रुपये

अहमदाबाद - १६,३५८ रुपये

कोलकाता - १६,३५३ रुपये

२२ कॅरेटच्या १ तोळा सोन्याचे तुमच्या शहरातील आजचे दर किती?

मुंबई - १४,९९० रुपये

पुणे - १४,९९० रुपये

चेन्नई - १५,१२० रुपये

बंगळुरू - १४,९९० रुपये

दिल्ली - १५,००५ रुपये

अहमदाबाद - १४,९९५ रुपये

कोलकाता - १४,९९० रुपये

१८ कॅरेटच्या १ तोळा सोन्याचे तुमच्या शहरातील आजचे दर किती?

मुंबई - १२,२६५ रुपये

पुणे - १२,२६५ रुपये

चेन्नई - १३,०३९ रुपये

बंगळुरू -१२,२६५ रुपये

दिल्ली - १२,२८० रुपये

अहमदाबाद - १२,२७० रुपये

कोलकाता - १२,२६५ रुपये

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : जळगावातील पहूरजवळील वाकोद शिवारात ५५ किलो गांजा जप्त

Summer Health Tips : कडाक्याच्या उन्हातून घरी आल्यावर या चूका टाळाच, अन्यथा....

Wardha : आयकर अधिकारी असल्याचं सांगितलं, सर्च वॉरंट दाखवलं; वर्ध्यात प्राध्यपकाच्या घरात चोरट्यांची घुसखोरी

Iran - Israel War: दुबईत अडकलेल्यांच्या मदतीला धावणार सोनू सूद; म्हणाला तुम्ही कुठेही असाल, 'मला मॅसेज करा...'

Dried Lipstick: जुनी-सुकलेली लिपस्टिक कचऱ्यात फेकताय? टाकून देण्यापूर्वी पाहा री-युज करण्याची स्मार्ट टीप्स

SCROLL FOR NEXT