Gold- Silver Price Today google
बिझनेस

Gold Price Today: आठवड्याच्या पहिल्या दिवशी सोनं महागलं, १ तोळ्यासाठी किती मोजावे लागणार? वाचा 18k- 22k आणि 24k चे दर

Gold- Silver Price Today: सोनं-चांदीच्या दरामध्ये आज मोठी वाढ झाली. गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात घसरण आणि चांदीचे दर स्थिर होते. पण आज दरात मोठा बदल झाला आहे.

Priya More
  • आठवड्याच्या पहिल्या दिवशी सोन्याच्या दरात वाढ झाली

  • २४, २२ आणि १८ कॅरेट सोन्याच्या दरात वाढ

  • २४ कॅरेटच्या १ तोळा सोन्याच्या दरामध्ये १७० रुपयांची वाढ झाली

  • चांदीच्या दरातही १ किलोमागे ५००० रुपयांची वाढ

सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. आठवड्याच्या पहिल्या दिवशी सराफा बाजार उघडताच सोनं-चांदीच्या दरात मोठा बदल पाहायला मिळाला. आज सोनं-चांदीच्या दरात मोठी वाढ झाली आहे. २४ कॅरेटच्या १ तोळा सोन्याच्या दरामध्ये १७० रुपयांची वाढ झाली आहे. २४ कॅरेटसोबत आज २२ आणि १८ कॅरेटच्या सोन्याच्या दरात देखील वाढ झाली आहे. तरा चांदीच्या दरात देखील वाढ झाली असून १ किलो चांदी ५००० रुपयांनी वाढ झाली आहे. सोनं-चांदीच्या दरात वाढ झाल्यामुळे ग्राहकांमध्ये नाराजी आहे. आज तुम्ही सोनं खरेदी करण्यासाठी जाणार असाल तर आजचे २४,२२ आणि १८ कॅरेट सोन्याचे दर किती ते जाणून घ्या...

गुड रिटर्न्सने दिलेल्या माहितीनुसार, आज २४ कॅरेटच्या १ तोळा सोन्याच्या दरामध्ये १७० रुपयांची वाढ झाली. हे सोनं खरेदी करण्यासाठी ग्राहकांना १,४३,४६० रुपये खर्च करावे लागणार आहेत. तर २४ कॅरेटच्या १० तोळा सोन्याच्या दरामध्ये १,७०० रुपयांची वाढ झाली आहे. हे सोनं खरेदीसाठी आज तुम्हाला १४,३४,६०० रुपये खर्च करावे लागणार आहे.

आज २२ कॅरेटच्या सोन्याच्या दरात देखील वाढ झाली. २२ कॅरेटच्या १ तोळा सोन्याच्या दरामध्ये १५० रुपयांची घसरण झाली. हे सोनं खरेदीसाठी तुम्हाला १,३१,५०० रुपये खर्च करावे लागतील. तर २२ कॅरेटच्या १० तोळा सोन्याच्या दरामध्ये १५०० रुपयांची वाढ झाली आहे. हे सोनं खरेदीसाठी तुम्हाला १३,१५,००० रुपये मोजावे लागतील.

२४ आणि २२ कॅरेट सोन्यापाठोपाठ आज १८ कॅरेटच्या सोन्याच्या दरात देखील वाढ झाली आहे. १८ कॅरेटचे १ तोळा सोनं १२० रुपयांनी महाग झालं आहे. हे सोनं खरेदीसाठी तुम्हाला १,०७,५९० रुपये मोजावे लागतील. तर १८ कॅरेटच्या १० तोळा सोन्याच्या दरामध्ये १२०० रुपयांची वाढ झाली आहे. हे सोनं खरेदीसाठी तुम्हाला १०,७५,९०० रुपये खर्च कारवे लागतील.

आज सोन्यापाठोपाठ चांदीच्या दरात देखील मोठी वाढ झाली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून चांदीचे दर स्थिर होते पण आता चांदीच्या दरात वाढ झाल्यामुळे ग्राहकांना धक्का बसला. आज १ ग्रॅम चांदी ५ रुपयांनी वाढली आहे. ही चांदी आज २३५ रुपयांना विकली जात आहे. तर १ किलो चांदीच्या दरात ५००० रुपयांची वाढ झाली आहे. ही चांदी २,३५,००० रुपयांना विकली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: कराडला मनोज जरांगे पाटील यांच्या स्वागताचे बॅंनर फाडले

Mumbai Local: मुंबईत धावत्या लोकलमधून पडून तरुणाचा मृत्यू, गर्दीमुळे हात सटकला अन् थेट खाडीत पडला

Urine Infection : लहान मुलांना युरिन इन्फेक्शन झाले तर शरीर देते 'हे' संकेत; पावसाळ्यात वेळीच उपचार करा, नाहीतर...

गोळ्या, औषधांची गरज नाही! फक्त हे एक ड्रिंक प्या, पोटदुखी कायमची थांबेल

8th Pay Commission : सरकारी कर्मचारी-पेन्शनधारकांसाठी मोठी बातमी! ₹69 हजार मिनिमम सॅलरी, ₹45 हजार पेन्शनची मागणी

SCROLL FOR NEXT