Gold Rate : बापरे ! एका दिवसात सोन्याच्या दरामध्ये तब्बल एक हजाराची वाढ

गुढीपाडवा, अक्षय तृतीया या मुहूर्तावर कोरोनामुळे लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे सोने खरेदी करण्याचे मुहुर्त हुकले.
Gold Rate : बापरे ! एका दिवसात सोन्याच्या दरामध्ये तब्बल एक हजाराची वाढ
Gold Rate : बापरे ! एका दिवसात सोन्याच्या दरामध्ये तब्बल एक हजाराची वाढSaam Tv
Published On

बारामती : सोन्याच्या दराने (Gold Rate) आजच्या दिवसात मोठी उसळी घेतली असून सोन्याच्या दरामध्ये तब्बल एक हजाराची वाढ झाली आहे. दिवाळीमुळे (Diwali) मागणी जास्त असून पुरवठा कमी असल्याने सोन्याच्या दरात वाढ झाली असल्याचे सांगितलं जात आहे. (An increase of one thousand in the price of gold)

हे देखील पहा -

गुढीपाडवा, अक्षय तृतीया या मुहूर्तावर कोरोनामुळे (Corona) लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊन (Lockdown) मुळे सोने खरेदी करण्याचे मुहुर्त हुकले. त्यामुळेच दिवाळीमध्ये लोकांनी सोने खरेदीसाठी मोठी लगबग केली. देवाळी संपेपर्यंत लग्नसराई सुरू झाली असून त्यामुळे सोन्याला मोठी मागणी वाढली आहे.

Gold Rate : बापरे ! एका दिवसात सोन्याच्या दरामध्ये तब्बल एक हजाराची वाढ
Instagram वापरण्यासाठी आता मोजावे लागणार पैसे... (पहा Video)

काल 24 कॅरेट सोन्याचा दर हा 48 हजार 350 रुपये प्रति प्रति तोळा होता तो दर आज 49 हजार 300 रुपये पर्यंत गेला आहे. 22 कॅरेट सोन्याचा काल 45 हजार 700 दर होता तो आज 46 हजार 700 झाला आहे तर 18 कॅरेट सोन्याचा दर काल 38 हजार तीनशे प्रति तोळा होता. तो दर 39 हजार 200 रुपये इतका झाला आहे अशी माहिती इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोशियन (Indian Bullion and Jewelers Association) चे राज्याचे समन्वयक किरण आळंदीकर यांनी दिली आहे.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com