सावधान ! तुमच्या चिप्समध्ये विष? एक्स्पायरी डेट बदलून चिप्सची विक्री

मुलांच्या डब्यात असोत किंवा प्रवासातला टाईमपास... चिप्स खायला सगळ्यांनाच आवडतात... मात्र, तुम्ही खात असलेले चिप्स घाणेरडे तर नाहीयेत ना...? हो... चला तर मग नेमकं प्रकरण काय आहे? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून...
EXPIRED CHIPS SOLD AFTER CHANGING EXPIRY DATES
EXPIRED CHIPS SOLD AFTER CHANGING EXPIRY DATESsaam tv
Published On

मुलांच्या डब्यात असोत किंवा प्रवासातला टाईमपास... चिप्स खायला सगळ्यांनाच आवडतात... मात्र, तुम्ही खात असलेले चिप्स मुदत उलटलेले तर नाहीयेत ना...हो... एका कंपनीत खाद्यपदार्थांची एक्स्पायरी डेट बदलून वाढीव तारीख टाकत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. हा सर्व प्रकार नवी मुंबईतील तुर्भे MIDCमध्ये सुरु असल्याचा पर्दाफाश झालाय. पोलिसांनी FDAच्या मदतीनं छापा टाकत मोठी कारवाई केलीये.

एक्स्पायरी डेट बदलून चिप्सची विक्री

तुर्भे एमआयडीसीमधील एका कंपनीत भारतीय उत्पादनांवरील मूळ 'एक्स्पायरी डेट' वाढवलेले स्टिकर चिकवले जात असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या मध्यवर्ती कक्षाला मिळाली होती. पोलिसांनी या ठिकाणी छापा टाकला. मोठ्या प्रमाणात खाद्यपदार्थाचा साठा आढळला. एफडीएला याची माहिती दिल्यानंतर धक्कादायक प्रकार समोर आला. याठिकाणी खाद्यपदार्थांच्या पाकिटांवरील मूळ मुदत बदलून नव्या मुदतीचे स्टिकर चिकटवण्याचा गोरख धंदा सुरू होता. विशेष म्हणजे परदेशातही हे खाद्यपदार्थ पाठवले जात असल्याचं उघडकीस आलं.

या प्रकरणी 12 जणांवर गुन्हे दाखल करून अटक करण्यात आलीय. खाद्यपर्दार्थामध्ये भेसळ करून नागरिकांच्या आरोग्याशी खेळण्याचे सर्रास प्रकार सुरू आहेत. आता चिप्ससारख्या हवाबंद पदार्थांसोबतही हे भेसळमाफिया तारखा बदलून लहान मुलांच्या जीवाशी खेळत आहेत. त्यामुळे अशा गुन्हेगारांवर कठोर कारवाईची गरज तर आहेत. मात्र तुम्हीही तुमच्या मुलांना बाहेरचे पदार्थ खाऊ घालताना काळजी घेण्याची गरज आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com