Gold Price Today Saam Tv
बिझनेस

Gold Price Today: गुड न्यूज! सोन्याच्या दरात मोठी घसरण, १० तोळे २६,२०० रुपयांनी स्वस्त; २४ आणि २२ कॅरेटचे आजचे दर किती?

Gold- Silver Price Today: सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. आज सोनं-चांदीच्या दरात मोठी घसरण झाली असून खरेदी करण्याची चांगली संधी आहे. सोनं-चांदी खरेदी करायला जाण्यापूर्वी वाचा आजचे दर किती?

Priya More

Summary -

  • सलग तिसऱ्या दिवशी सोन्याच्या दरात मोठी घसरण

  • १० तोळा सोनं आज २६,२०० रुपयांनी स्वस्त झाले

  • २४ कॅरेट सोनं १,५५,७८० रुपयांवर आले

  • २२ कॅरेट सोनं १,४२,८०० रुपयांवर आले

  • आज चांदीच्या दरात देखील मोठी घसरण

  • १ ग्रॅम चांदीच्या दरात १५ रुपयांची घसरण

सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. सलग तिसऱ्या दिवशी सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे. सोनं-चांदीचे दर घसरल्यामुळे खरेदी करण्याची आज चांगली संधी आहे. सोनं-चांदीच्या दरात मोठी घसरण झाल्याने ग्राहकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. आज १० तोळा सोन्याच्या दरात तब्बल २६,२०० रुपयांनी घसरण झाली आहे. तर १ ग्रॅम चांदीचे दर १५ रुपयांनी कमी झाले आहे. आज सोनं-चांदी खरेदी करताना ग्राहकांच्या खिशाला कात्री लागणार नाही. सोनं-चांदी खरेदी करायला जाण्यापूर्वी आजचे १८, २२ आणि २४ कॅरेटच्या १ तोळा सोन्याचे दर आणि चांदीचे दर किती आहेत ते जाणून घ्या...

गुड रिटर्न्सने दिलेल्या माहितीनुसार, आज २४ कॅरेटच्या सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे. २४ कॅरेटचे १ तोळा सोनं २,६२० रुपयांनी स्वस्त झाले आहे. आज २४ कॅरेटचे एक तोळा सोनं खरेदीसाठी १,५५,७८० रुपये खर्च करावे लागणार आहेत. गुरूवारी १ तोळा सोनं १,५८,४०० रुपयांना विकले गेले. तर २४ कॅरेटचे १० तोळा सोनं तब्बल २६,२०० रुपयांनी स्वस्त झाले आहे. हे सोनं खरेदी करण्यासाठी आज तुम्हाला १५,५७,८०० रुपये खर्च करावे लागणार आहे. गुरूवारी हेच सोनं १५,८४,००० रुपयांना विकले गेले.

आज २२ कॅरेटच्या सोन्याच्या दरात देखील मोठी घसरण झाली आहे. २२ कॅरेटच्या १ तोळा सोन्याच्या दरामध्ये २,४०० रुपयांनी घसरण झाली आहे. हे सोनं खरेदी करण्यासाठी आज तुम्हाला १,४२,८०० रुपये खर्च करावे लागणार आहे. गुरूवारी हे सोनं १,४५,२०० रुपयांना विकले गेले. तर २२ कॅरेटचे १० तोळा सोनं २४,००० रुपयांनी स्वस्त झालं आहे. हे सोनं खरेदी करण्यासाठी आज तुम्हाला १४,२८,००० रुपये खर्च करावे लागणार आहेत. गुरूवारी हे सोनं १४,५२,००० रुपयांना विकले गेले.

२४ आणि २२ कॅरेटच्या सोन्यापाठोपाठ आज १८ कॅरेटच्या सोन्याच्या दरात देखील मोठी घसरण झाली आहे. आज १८ कॅरेटचे १ तोळा सोनं १,९६० रुपयांनीस्वस्त झाले आहे. हे सोनं खरेदीसाठी आज तुम्हाला १,१६,८४० रुपये खर्च करावे लागतील. गुरूवारी हे सोनं १,१८,८०० रुपयांना विकले गेले. तर आज १८ कॅरेटच्या १० तोळा सोन्याच्या दरामध्ये १९,६०० रुपयांची घसरण झाली. हे सोनं खरेदी करण्यासाठी आज तुम्हाला ११,१६,८४० रुपये खर्च करावे लागणार आहेत. गुरूवारीवारी हे सोनं ११,८८,००० रुपयांना विकले गेले.

दरम्यान, सोन्यापाठोपाठ आज चांदीच्या दरात देखील मोठी घसरण झाली आहे. आज १ ग्रॅम चांदीच्या दरात १५ रुपयांनी घसरण झाली आहे. १ ग्रॅम चांदी खरेदीसाठी आज तुम्हाला २८० रुपये खर्च करावे लागणार आहे. तर १ किलो चांदी तब्बल १५,००० रुपयांनी स्वस्त झाली आहे. ही चांदी खरेदीसाठी आज तुम्हाला २,८०,००० रुपये खर्च करावे लागणार आहे.

१ ग्रॅम सोन्याचे तुमच्या शहरातील आजचे दर -

मुंबई - १५,५७८ रुपये

पुणे- १५,५७८ रुपये

दिल्ली - १५,५९३ रुपये

चेन्नई - १५,७०९ रुपये

बंगळुरू - १५,५७८ रुपये

हैदराबाद - १५,५७८ रुपये

अहमदाबाद - १५,५८३ रुपये

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shubhangi Kedar Wedding: मराठमोळी गायिका अडकली लग्नबंधनात; कोणासोबत थाटणार संसार?

Heart Attack: हार्ट अटॅक येण्याच्या ४८ तास अगोदर शरीर देतं २ संकेत; वेळीच समजून जीव वाचवा

Maharashtra Live News Update: यवतमाळ शहरात महावितरणची भव्य जनजागृती रॅली

Health Care: डाईट करताना कधीच सकाळचा नाश्ता स्किप करु नका, नाहीतर आरोग्यावर होतील 'हे' परिणाम

'तुला लय मस्ती आलीय!', पोलिस पाटलावर जीवघेणा हल्ला, लोखंडी रॉड डोक्यात घातला नंतर...

SCROLL FOR NEXT