आज देशभरात सोन्याच्या किंमतीत मोठी घसरण नोंदली गेली
दिल्लीमध्ये २४ कॅरेट सोनं प्रति तोळा ₹1,24,400 आणि २२ कॅरेट ₹1,14,040 इतका भाव आहे.
जागतिक बाजार घसरण, डॉलर स्थिरता आणि मागणी कमी झाल्यामुळे सोन्याच्या दरात आणखी घट होण्याचा अंदाज
Why gold prices are falling globally and in India 21 November update : गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या किंमती अचानक कमी होत आहेत. आजही (२१ नोव्हेंबर) सोन्याच्या किंमतीत मोठी घसरण झाली आहे. मुंबई, राजधानी दिल्ली, पुणे, चेन्नईसह देशभरात आज सोन्याच्या किंमतीत कपात झाली आहे. दिल्लीमध्ये २४ कॅरेट सोन्याची प्रति तोळा किंमत १२४४०० रूपये इतकी झाली आहे.
जागतिक बाजारात सोन्याची किंमत ४०६१.५३ प्रति औंसवर आला आहे. जागतिक बाजार आणि डॉलरच्या किंमती स्थिरावल्याने सोन्याच्या मागणीत घट झाली आहे. त्यामुळे देशांतर्गत सराफा बाजारात सोन्याच्या किंमतीमध्येही कपात होत आहे. सोन्याच्या किंमती कपात झाल्यामुळे लग्नसराईत सोन्याच्या विक्रीत वाढ होऊ शकते. पुढील काही दिवसांत सोन्याच्या किंमतीमध्ये मोठ्या प्रमाणात कपात होऊ शकते, असा अंदाज वर्तवला जातोय.
राजधानी दिल्लीमध्ये सोन्याची किंमती किती?
राजधानी दिल्लीमध्ये २४ कॅरेट सोन्याची किंमत प्रति तोळा १२४४०० रूपये इतकी आहे. तर २२ कॅरेट सोन्याची किंमत ११४०४० रूपये प्रति १० ग्रॅम इतकी आहे.
मुंबई, चेन्नई अन् कोलकात्यामध्ये काय स्थिती ?
चेन्नई, मुंबई आणि कोलकात्यामध्ये सोन्याच्या किंमतीमध्ये कपात झाली आहे. प्रति तोळा २२ कॅरेट सोन्याची किंमत ११३८९० तर २४ कॅरेटची किंमत १२४२५० रूपये इतकी झाली आहे.
पुणे आणि बंगळुरूमध्ये सोन्याचे दर झपाट्याने कमी होत आहेत. आज २४ कॅरेट सोन्याची किंमत प्रति तोळा १२४२५० रूपये इतकी आहे. तर २२ कॅरेट सोन्याची किंमत ११३८९० रूपये प्रति ग्रॅम इतकी आहे.
डिसेंबर २०२६ पर्यंत सोन्याचा भाव ४,९०० डॉलर प्रति औंसपर्यंत पोहोचण्याचा अंदाज गोल्डमन सॅक्सने वर्तवला आहे. पुढील वर्षाच्या मध्यापर्यंत सोन्याचा भाव ४,६०० डॉलर प्रति औंसपर्यंत येईल, असा विश्वास तज्ज्ञांनी व्यक्ती केला.
सोन्याच्या दराप्रमाणेच चांदीच्या किमतीही घसरण पाहायला मिळाली. २१ नोव्हेंबर रोजी चांदी प्रति किलो १६४,९०० रुपयांवर आली आहे. विदेशी बाजारात चांदीची किंमत प्रति औंस $५०.७३ वर पोहोचली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.