Gold Rate Today Saam Tv
बिझनेस

लग्नाच्या मोसमात सोन्याच्या दराने मारली उसंडी; १० तोळं सोन्याच्या भावात किती रूपयांची वाढ? वाचा लेटेस्ट दर

Gold Rates Jump Sharply: डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात सोन्याच्या भावात वाढ झाली आहे. दर, चांदीच्या दरात घसरण झाली आहे.

Bhagyashree Kamble

सुरक्षित गुंतवणुकीच्या दृष्टीने सोन्याची चमक अजूनही कायम आहे. सध्या लग्नसराईचा मोसम सुरू आहे. या काळात सोन्याचे दागिने हमखास खरेदी केली जाते. मात्र, दिवाळीनंतर सोन्याच्या भावातील चढता आलेख अद्याप हवा तसा घसरलेला नाही. यामुळे सोनं खरेदी करताना सामान्यांच्या खिशाला अर्थात झळ बसते. आज डिसेंबर महिन्यातील दुसरा आठवडा. दरम्यान, आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोन्याच्या भावात वाढ झाली आहे.

आज ८ डिसेंबर २०२५. सोन्याच्या दरात कमालीची वाढ झाली आहे. २४ कॅरेट १० ग्रॅम सोन्याच्या दरात २७० रूपयांची वाढ झाली आहे. तर, २४ कॅरेट १ तोळं सोनं खरेदीसाठी आपल्याला १,३०,४२० रूपये मोजावे लागतील. तर, २४ कॅरेट १०० ग्रॅम सोन्याच्या दरात २,७०० रूपयांची वाढ झाली आहे. २४ कॅरेट १० तोळं सोनं खरेदीसाठी आपल्याला १३,०४,२०० रूपये मोजावे लागतील.

२४ सह २२ कॅरेट सोन्याच्या दरातही वाढ झालीये. २२ कॅरेट १० ग्रॅम सोन्याच्या दरात २५० रूपयांची वाढ झाली आहे. २२ कॅरेट १ तोळं सोनं खरेदीसाठी आपल्याला १,१९,५०० रूपये मोजावे लागतील. तर, २२ कॅरेट १०० ग्रॅम सोन्याच्या दरात २,५०० रूपयांची वाढ झाली आहे. २२ कॅरेट १० तोळं सोनं खरेदीसाठी आपल्याला ११,९५,५०० रूपये मोजावे लागतील.

२४, २२ सह १८ कॅरेट सोन्याच्या भावात वाढ झाली आहे. १८ कॅरेट १० ग्रॅम सोन्याच्या दरात २१० रूपयांची वाढ झाली आहे. १८ कॅरेट १ तोळं सोनं खरेदीसाठी आपल्याला ९७,८२० रूपये मोजावे लागतील. तर, १८ कॅरेट १०० ग्रॅम सोन्याच्या दरात २,१०० रूपयांची वाढ झाली आहे. १८ कॅरेट १० तोळं सोनं खरेदीसाठी आपल्याला ९,७८,२०० रूपये मोजावे लागतील.

सोन्याच्या भावात वाढ जरी झाली असली तरी, चांदीच्या भावात घसरण झाली आहे. १ ग्रॅम चांदीच्या भावात १ रूपयाची घसरण झाली आहे. १ ग्रॅम चांदी खरेदीसाठी आपल्याला १८९ रूपये मोजावे लागतील. तर, १ किलो चांदीमागे १००० रूपयांची घसरण झाली आहे. १ किलो चांदी खरेदीसाठी आपल्याला १,८९,००० रूपये मोजावे लागतील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: ईकेवायसी, २१०० रुपये, बोगस लाभार्थी... लाडकी बहीण योजनेवर मंत्री आदिती तटकरेंचं महत्त्वाचं विधान

Maharashtra Live News Update: पुढील पंधरा दिवस कसबा गणपती मंदिर बंद राहणार

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना ₹ २१०० रुपये कधी मिळणार? एकनाथ शिंदेंनी विधानसभेत दिली मोठी अपडेट

Walking Mistakes: वजन कमी करण्यासाठी रोज चालायला जाताय? मग या चुका होणार नाहीत याची घ्या काळजी

Tejaswini Lonari Honeymoon Photos: अभिनेत्री तेजस्विनी लोणारीची हनिमून ट्रिप, रोमॅन्टिक पहिला फोटो आला समोर

SCROLL FOR NEXT