Buying Gold In Diwali Saam Tv
बिझनेस

Buying Gold In Diwali : धनत्रयोदशी, लक्ष्मी पूजनाच्या मुहूर्तावर सोनं खरेदी करण्याचा विचार करताय? या गोष्टी लक्षात ठेवाच!

Festival Season Buying Gold : धनत्रयोदशी आणि लक्ष्मी पूजनाच्या मुहूर्तावर अनेकजण सोनं खरेदी करतात.

कोमल दामुद्रे

Important Gold Buying Tips :

लवकरच दिवाळीच्या सणाला सुरुवात होईल. या काळात सोन्याच्या दागिन्यांना विशेष महत्त्व असते. धनत्रयोदशी आणि लक्ष्मी पूजनाच्या मुहूर्तावर अनेकजण सोनं खरेदी करतात.

दिवाळीच्या काळात सोनं खरेदी करणे शुभ मानले जाते. शिवाय गुंतवणूकीसाठी देखील सोनं फायदेशीर ठरते. परंतु, या काळात आपली फसवणूक देखील केली जाते. जर तुम्ही देखील या दिवाळीला सोनं खरेदी करण्याचा विचार करत असाल तर या गोष्टींची काळजी जरुर घ्या. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

1. सर्टिफाइड सोनं खरेदी करा

ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स (BIS)द्वारे प्रमाणित केलेले सोने खरेदी करा. यामध्ये सोन्याच्या शुद्धतेची माहिती मिळते. तसेच BIS द्वारे हॉलमार्क कोड, टेस्टिंग लॅबचे चिन्ह आणि गॅरेटी मिळते. त्यासाठी हॉलमार्कचे (Hallmarks) सोनं खरेदी करणे चांगले.

2. सोन्याची शुद्धता कशी तपासाल?

सोन्याची शुद्धता तपासण्यासाठी त्याला २४ कॅरेटमध्ये मोजले जाते. तसेच ते २४, २२, २८ कॅरेटमध्ये देखील मोजले जाते. याला Coin Gold असे देखील म्हणतात. २४ कॅरेटचे सोने हे सगळ्यात शुद्ध सोन समजले जाते. त्यामुळे खरेदी (Shopping) करताना ते २४ कॅरेटचे आहे का हे तपासा.

3. मेकिंग चार्जेस

सोनं खरेदी करताना तुम्हाला मेकिंग चार्जेस देखील द्यावे लागतात. यामध्ये ज्वेलर्स सोन्याच्या किमतीत सतत बदलत असतात. त्यासाठी दागिने खरेदी करताना मेकिंग चार्जेस किती आकारले जाईल याविषयी माहिती असणे गरजेचे आहे.

4. विश्वासू ज्वेलर्सकडून खरेदी करा

दागिने खरेदी करताना विश्वासू ज्वेलर्सकडून दागिने खरेदी करा. ज्यामुळे फसवणूकीचा धोका कमी होईल. तसेच सणासुदीच्या काळात अनेक ज्वेलर्स ऑफर्स देतात. त्याविषयी देखील माहिती असणे गरजेचे आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: कुवेत- हैदराबाद इंडिगो फ्लाइटमध्ये बॉम्ब असल्याची धमकी

Maharashtra Politics: एकनाथ शिंदेंनीच मालवणमध्ये पैशांच्या बॅगा आणल्या, निवडणुकीत पैसे वाटल्याचा वैभव नाईकांचा आरोप; VIDEO चर्चेत

Maharashtra Nagar Parishad Live : बदलापूरमध्ये वातावरण तापलं, भाजप-शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा

Chaturgrahi Yog In Dhanu: ५० वर्षांनंतर बनणार चतुर्ग्रही योग; या राशी मानसन्मानासह रातोरात कमावणार पैसा

शिंदेसेनेचे आमदार संतोष बांगरांकडून मतदान करताना नियमांचे उल्लंघन, बूथवर 'त्या' महिलेला नेमकं काय सांगितलं?

SCROLL FOR NEXT