Gold Hallmark: तुमच्याकडील सोनं बनावट? राज्यात दीड कोटींपेक्षा जास्त किमतीचे बनावट हॉलमार्क केलेलं सोनं जप्त

मुंबई, ठाणे, पुणे आणि नागपूर या मुख्य शहरांसह महाराष्ट्रातील 6 ठिकाणी एकाच वेळी छापे टाकण्यात आले.
BIS
BIS Saam TV

मुंबई : सोनं खरेदी करताना त्यावरील हॉलमार्क सोन्याच्या सुद्धतेची हमी देतो. मात्र हॉलमार्कचं बनावट असेल तर काय करायचं? असा प्रश्न पडायचं कारण की, मुंबई, ठाणे, पुणे आणि नागपूर या मुख्य शहरांसह महाराष्ट्रातील 6 ठिकाणी एकाच वेळी छापे टाकण्यात आले. मुंबईतील झवेरी बाजार येथे सोन्याच्या दागिन्यांवर बनावट हॉलमार्किंग करणाऱ्या दोन आस्थापनांवर छापे टाकून कारवाई केली, त्यात सुमारे 1.5 कोटी रुपयांचे 2.75 किलो सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत.

भारतीय मानक ब्युरोने (BIS,बीआयएस ब्युरो) सोन्याच्या दागिन्यांवरील बीआयएस चिन्हाचा (BIS, Hallmark) गैरवापर रोखण्यासाठी 20 जानेवारी रोजी महाराष्ट्र राज्यातील प्रमुख शहरांमध्ये विशेष अंमलबजावणी मोहीम राबवली. मुंबई, ठाणे, पुणे आणि नागपूर या मुख्य शहरांसह महाराष्ट्रातील 6 ठिकाणी एकाच वेळी छापे टाकण्यात आले. यावेळी बीआयएसप्रमाणे सुयोग्य चाचणी आणि गुणवत्ता तपासणी न करता, सोन्याच्या दागिन्यांवर बनावट हॉलमार्क लावून ग्राहकांची फसवणूक करणार्‍या कंपन्यांविरुद्ध कारवाई करण्यात आली.

याठिकाणी छापेमारी

मेसर्स श्रीशंकेश्‍वर ॲसेइंग अँड टंच, झवेरी बाजार, मुंबई, मे. जय वैष्णव हॉलमार्किंग सेंटर, झवेरी बाजार, मुंबई, मे. विशाल हॉलमार्किंग सेंटर, जांभळी नाका, ठाणे,मेसर्स श्रीशंकेश्‍वर ॲसेइंग अँड हॉलमार्किंग सेंटर, अंधेरी, मुंबई, मे. जोगेश्वरी ॲसेइंग अँड हॉलमार्किंग सेंटर, रविवार पेठ, पुणे आणि मे. रिद्धी सिद्धी हॉलमार्क, इतवारी, नागपूर या ठिकाणी देखील छापा टाकून जप्तीची कारवाई करण्यात आली.

BIS
Bacchu Kadu: अपघात की घातपात? अपघातानंतर पहिल्यांदा बच्चू कडू स्पष्टच बोलले

16 जून 2021 पासून केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्रालय, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयाचा ग्राहक व्यवहार विभाग, यांनी जारी केलेल्या सोन्याचे दागिने आणि सुवर्ण कलाकृती विक्री, 2020 च्या नुसार, सोन्याचे दागिने आणि सोन्याच्या कलाकृतींवर 16 जून 2021 पासून बिआयएस हॉलमार्किंग अनिवार्यपणे आहे.

बिआयएस हॉलमार्किंगचे सध्या 3 भाग आहेत - बिआयएस चिन्ह ( लोगो), कॅरेटची शुद्धता आणि सूक्ष्मता आणि 6 अंकी अल्फान्यूमेरिक "हॉलमार्किंग युनिक आयडेंटिटी नंबर(HUID)" जो प्रत्येक वस्तू/ कलाकृतीसाठी वेगळा आहे. दागिने फक्त बिआयएस (BIS) मध्ये नोंदणीकृत केलेल्या सराफांमार्फत विकले जाऊ शकतात आणि फक्त बिआयएस मान्यताप्राप्त ॲसेइंग आणि हॉलमार्किंग सेंटर (AHCs) द्वारे हॉलमार्क केले जाऊ शकतात.

दोन वर्ष कारावासाची तरतूद

बीआयएस कायदा 2016 नुसार, बीआयएस मानक चिन्हाचा गैरवापर केल्यास दोन वर्षांपर्यंत कारावास किंवा किमान 2,00,000,रुपये दंडाची शिक्षा आहे,परंतु हॉलमार्कसह किंवा बीआयएस कायदा 2016 नुसार स्टँडर्ड मार्कसह चिकटवलेल्या किंवा लागू केलेल्या वस्तूच्या मूल्याच्या दहापट पर्यंत सुध्दा ही रक्कम वाढविता येते. वर नमूद केलेल्यांवर न्यायालयात खटला दाखल करण्याची कारवाई सुरू केली जात आहे. अशा बेकायदेशीर बनावट मार्किंगमध्ये सहभागी असलेल्यांवर कारवाई करण्यात येणार आहे.

BIS
शिवसेनाप्रमुखांच्या नावे सुरू झालेला ढोंगाचा बाजार कायमचा गाडण्याचा निर्धार केला पाहिजे, सामनातून जहरी टीका; मोदी-शाहांवरही निशाणा

अनेक वेळा असेही निदर्शनास आले आहे की, बनावट हॉलमार्क केलेले दागिने ग्राहकांना मोठ्या नफा घेऊन विकले जातात. म्हणून बिआयएस चिन्ह,( BIS logo) कॅरेटमधील शुद्धता आणि सूक्ष्मता आणि दागिन्यांवर क्रमांकासह (HUID) यासह संपूर्ण BIS हॉलमार्क कोरलेला तपासून घेणे महत्त्वाचे आहे. हॉलमार्क युनिक आयडी, (HUID) प्रत्येक सोन्याच्या दागिन्यावर कोरलेला एक विशिष्ट कोड असतो, जो त्यावर चिन्हांकित बिआय एस BIS हॉलमार्कला प्रमाणीत करतो. बिआय एस केअर (BIS CARE) हे मोबाईल ऍप्लिकेशन वापरून दागिन्यांची शुद्धता, दागिन्यांचा प्रकार, जेथून दागिने हॉलमार्क केले आहेत आणि दागिन्यांची चाचणी प्रमाणित केली आहे, त्या हॉलमार्किंग केंद्रासह सराफाचे नाव इत्यादी हॉलमार्क केलेल्या दागिन्यांचे तपशील देखील खरेदी करण्यापूर्वी, HUID क्रमांक टाकून तपासला जाऊ शकतो.

जर एखाद्या ग्राहकाला कोणत्याही दागिन्यांवर/वस्तूवर बिआयएस हॉलमार्कचा गैरवापर केल्याचे आढळल्यास, बिआयएस केअर मोबाईल ऍप्लिकेशन वापरून बीआयएसला त्याची माहिती दिली जाऊ शकते. बीआयएस अशा माहितीचा स्रोत गोपनीय ठेवते.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com