Gold Silver Price Today Saam Tv
बिझनेस

Gold Price: सोन्याला पुन्हा चकाकी, १० तोळा सोनं ३२,८०० रुपयांनी वाढले; वाचा आजचे दर

Gold Silver Price Today: सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांच्या खिशाला पुन्हा कात्री लागणार आहे. सोनं आणि चांदी दोघांच्या दरात आज मोठी वाढ झाली आहे. सोनं-चांदी खरेदी करायला जाण्यापूर्वी आजचे दर किती आहेत हे घ्या जाणून...

Priya More

Summary -

  • आठवड्याच्या दुसऱ्या दिवशी सोन्याच्या दरात मोठी वाढ झाली

  • २४ कॅरेटचे १० तोळा सोन्याच्या दरात ३२,८०० रुपयांनी वाढ झाली

  • २२ कॅरेट आणि १८ कॅरेट सोन्याच्या दरातही वाढ झाली

  • चांदीच्या दरात प्रति किलो ४,००० रुपयांची वाढ झाली.

दिवाळीपूर्वी सोन्याच्या दरात वाढ होताना दिसत आहे. आज आठवड्याच्या दुसऱ्या दिवशी सोन्याच्या दरात मोठी वाढ झाली आहे. चांदीच्या दरात देखील चांगलीच वाढ झाली आहे. सोनं-चांदीच्या दरात सतत वाढ होत असल्यामुळे ग्राहकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. आज २४ कॅरेटच्या १० तोळा सोन्याच्या दरामध्ये तब्बल ३२,८०० रुपयांनी वाढ झाली आहे. आज तुम्ही सोनं-चांदी खरेदी करायला जाणार असाल तर आजचे दर किती ते एकदा पाहून जा...

गुड रिटर्न्सने दिलेल्या माहितीनुसार, आज २४ कॅरेटच्या सोन्याच्या दरात सर्वात मोठी वाढ झाली आहे. २४ कॅरेटच्या १ तोळा सोन्याचे दर ३,३८० रुपयांनी वाढले आहेत. आज २४ कॅरेटच्या एक तोळा सोन्याच्या खरेदीसाठी तुम्हाला १,२८,६८० रुपये खर्च करावे लागणार आहे. तर २४ कॅरेटच्या १० तोळा सोन्याच्या दरामध्ये तब्बल ३२,८०० रुपयांनी वाढ झाली असून हे सोनं खरेदी करण्यासाठी आज तुम्हाला १२,८६,८०० रुपये खर्च करावे लागणार आहेत. कालपर्यंत हे सोनं १२,५४,००० रुपयांमध्ये विकले गेले.

आज २२ कॅरेटच्या सोन्याच्या दरात देखील चांगलीच वाढ झाली आहे. आज २२ कॅरेटच्या १ तोळा सोन्याच्या दरामध्ये ३,००० रुपयांनी वाढ झाली आहे. हे सोनं खरेदी करण्यासाठी आज तुम्हाला १,१७,९५० रुपये मोजावे लागणार आहे. तर २२ कॅरेटच्या १० तोळा सोन्याच्या दरामध्ये तब्बल ३०,००० रुपयांनी वाढ झाली आहे. हे सोनं खरेदी करण्यासाठी आज तुम्हाला ११,७९,५०० रुपये मोजावे लागणार आहेत. कालपर्यंत हे सोनं ११,४९,५०० रुपयांना विकले गेले.

२४ आणि २२ कॅरेट सोन्यापाठोपाठ १८ कॅरेटच्या सोन्याच्या दरात देखील मोठी वाढ झाल्याचा पाहायला मिळत आहे. १८ कॅरेटच्या १ तोळा सोन्याच्या दरात २,४६० रुपयांनी वाढ झाली आहे. हे सोनं खरेदीसाठी आज तुम्हाला ९६,५१० रुपये खर्च करावे लागणार आहेत. तर १८ कॅरेटच्या १० तोळा सोन्याच्या दरामध्ये २४,६०० रुपयांनी वाढ झाली आहे. हे सोनं खरेदीसाठी आज तुम्हाला ९,६५,१०० रुपये मोजावे लागतील. कालपर्यंत हे सोनं ९,४०,५०० रुपयांवर विकले गेले.

दरम्यान, सोन्यापाठोपाठ आज चांदीने देखील भाव खाल्ला आहे. चांदीच्या दरात देखील मोठी वाढ झाली आहे. १ ग्रॅम चांदी ४ रुपयांनी महागली आहे. ही चांदी खरेदी करण्यासाठी आज तुम्हाला १८९ रुपये खर्च करावे लागणार आहेत. तर १ किलो चांदीच्या दरामध्ये ४००० रुपयांनी वाढ झाली आहे. आज ही १ किलो चांदी खरेदी करण्यासाठी तुम्हाला १,८९,००० रुपये मोजावे लागतील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Stomach cancer:तुमच्या शरीरात दिसून येणारे 'हे' संकेत आहेत पोटाच्या कॅन्सरचे; ट्यूमर तयार होण्यापूर्वी दिसतात बदल

Pune : नाशिकनंतर पुण्यात पोलिसांकडून कारवाईचा धडाका; १८ सराईत गुन्हेगार तडीपार, नावे आली समोर

Veen Doghatli Hi Tutena: स्वानंदी–समरची लग्नगाठ बांधली जाणार पण...; 'वीण दोघांतली ही तुटेना'मध्ये येणार नवा ट्विस्ट

IPS अधिकारी आत्महत्या प्रकरणात मोठा ट्विस्ट, तपास अधिकाऱ्याने आयुष्य संपवलं; सुसाईड नोटमधून गंभीर आरोप

Maharashtra Live News Update: निवडणुकांच्या अनुषंगाने सर्व जिल्हाध्यक्षांची अजित पवारांच्या उपस्थितीत बैठक पार पडणार

SCROLL FOR NEXT