Nupur Bora: ६ वर्षांत मोठे कांड! 2 कोटींची रोकड, सोनं अन चांदी, नुपूर बोराकडे इतकं घबाड आलं कुठून?

ACS Officer Nupur Bora: आसामच्या नागरी सेवा अधिकारी नुपूर बोरा यांच्यावर बेकायदेशीर संपत्ती जमवण्याचा आरोप आहे. या प्रकरणात त्यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्या घरावर छापा टाकत २ कोटींचे सोनं, चांदी आणि रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे.
ACS Officer Nupur Bora: ६ वर्षांत मोठे कांड! 2 कोटींची रोकड, सोनं अन चांदी, नुपूर बोराकडे इतकं घबाड आलं कुठून?
ACS Officer Nupur BoraSaam Tv
Published On

Summary -

  • नुपूर बोरा या आसामच्या नागरी सेवा अधिकारी असून त्यांच्यावर बेकायदेशीर संपत्ती जमवण्याचा आरोप आहे.

  • त्यांच्या निवासस्थानावर छापे टाकून २ कोटी रुपयांहून अधिक किंमतीचे रोख रक्कम आणि दागिने जप्त करण्यात आले.

  • जमीन वाटप प्रकरणात संशयास्पद व्यक्तींना जमिनी दिल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.

  • कृषक मुक्ती संग्राम समितीने तक्रार दाखल केल्यानंतर पोलिस तपास करत असून अजूनही मालमत्ता जप्त करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

आसामच्या नागरी सेवा अधिकारी नुपूर बोरा सध्या चर्चेत आल्या आहेत. बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी नुपूर बोरा यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून कोट्यवधी रुपयांचे दागिने आणि २ कोटींची रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. ६ वर्षांच्या कार्यकाळात अनेक प्रकरणामुळे नुपूर बोरा चर्चेत आल्या आहेत. वादग्रस्त जमिनीच्या व्यवहारांमुळे गेल्या ६ महिन्यांपासून त्यांच्यावर पोलिसांकडून नजर होती. त्यांच्यावर आरोप आहे की त्यांनी पैशांसाठी हिंदूंच्या मालकीच्या जमिनी संशयास्पद व्यक्तींना दिल्या.

ACS Officer Nupur Bora: ६ वर्षांत मोठे कांड! 2 कोटींची रोकड, सोनं अन चांदी, नुपूर बोराकडे इतकं घबाड आलं कुठून?
Jalgaon Crime : दोन कुटुंबात जुना वाद उफाळला; हाणामारीत एकाच मृत्यू, एकाची प्रकृती गंभीर

३१ मार्च १९८९ रोजी जन्मलेल्या नुपूर बोरा या गोलाघाट जिल्ह्यात राहणाऱ्या आहेत. त्या एसीएस अधिकारी आहेत आणि २०१९ मध्ये त्यांनी सेवेला सुरुवात केली. सध्या त्या कामरूप जिल्ह्यातील गोरोईमडी येथे सर्कल ऑफिसर म्हणून कार्यरत होत्या. गुवाहाटी विद्यापीठातून त्यांनी इंग्रजी साहित्यात बॅचलर पदवी मिळवली आहे. त्यांनी कॉटन कॉलेजमधूनही शिक्षण घेतले आहे. नागरी सेवेत येण्यापूर्वी बोरा लेक्चरर होत्या.

ACS Officer Nupur Bora: ६ वर्षांत मोठे कांड! 2 कोटींची रोकड, सोनं अन चांदी, नुपूर बोराकडे इतकं घबाड आलं कुठून?
Nashik Crime : नाशिक पोलिसांची मोठी कारवाई; भाजपच्या नेत्याला अटक, राजकीय वर्तुळात खळबळ

नुपूर बोरा यांनी कार्बी आंगलोंग येथे सहाय्यक आयुक्त म्हणून प्रशासकीय कारकिर्दीची सुरुवात केली होती. मार्च २०१९ ते जून २०२३ पर्यंत त्या या पदावर कार्यरत होत्या. जून २०२३ मध्ये त्यांची बारपेटा येथे सर्कल ऑफिसर म्हणून नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर त्यांची कामरूपी इथेच बदली झाली.

नुपूर बोरा यांनी फक्त ६ वर्षांच्या सेवेत प्रचंड संपत्ती जमवली असल्याचा आरोप आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, बोरा यांच्या गुवाहाटी येथील निवासस्थानातून ९२ लाख रुपये रोख आणि सुमारे २ कोटी रुपयांचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. याशिवाय आणखी तीन ठिकाणी छापे टाकण्यात आले आहेत.

ACS Officer Nupur Bora: ६ वर्षांत मोठे कांड! 2 कोटींची रोकड, सोनं अन चांदी, नुपूर बोराकडे इतकं घबाड आलं कुठून?
Akola Crime : दगडाने ठेचून एकाची निर्घृण हत्या; मारेकरी मृतदेहाजवळ जाऊन झोपला, अकोला जिल्हा रुग्णालयातील घटना

एसपींनी सांगितले की, नुपूर बोरा यांच्याविरोधात अनेक गंभीर आरोप आहेत आणि या प्रकरणाचा तपास सुरू आहे. तपास पूर्ण होईपर्यंत आम्ही अधिक रोख रक्कम आणि इतर गोष्टी वसूल करू शकतो. केएमएसएस म्हणजेच कृषक मुक्ती संग्राम समितीने बोरा यांच्याविरुद्ध तक्रार दाखल केली होती. त्यांनी जमिनीशी संबंधित सेवांसाठी रेट कार्ड तयार केले होते.

ACS Officer Nupur Bora: ६ वर्षांत मोठे कांड! 2 कोटींची रोकड, सोनं अन चांदी, नुपूर बोराकडे इतकं घबाड आलं कुठून?
Crime News : जमिनीच्या वादातून अपहरण करत हत्या; शहापूर तालुक्यातील घटनेने खळबळ

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com