Gold and silver prices  Saam Tv
बिझनेस

Gold- Silver Price: सोनं-चांदीच्या दरात मोठी घसरण, सोनं ३७००० तर चांदी १.७५ लाखांनी स्वस्त; वाचा आजचे दर

Gold and Silver Prices Fall: सोनं-चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. गेल्या १४ दिवसांत सोनं ३७००० तर चांदी १.७५ लाखांनी स्वस्त झालं आहे. त्यामुळे सोनं-चांदी खरेदीचा चांगली संधी आहे.

Priya More

Summary -

  • गेल्या १४ दिवसांत सोनं आणि चांदीच्या दरात मोठी घसरण झाली

  • १ किलो चांदी १.७५ लाखांनी तर सोनं ३७००० रुपयांनी स्वस्त झाले

  • उच्चांकानंतर दर कमी झाल्याने ग्राहकांना दिलासा

  • सोनं-चांदी खरेदीसाठी चांगली संधी आहे

सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. सोनं-चांदीच्या दरात गेल्या काही दिवसांपासून चढ-उतार सुरू आहे. गेल्या आठवड्याच्या शुक्रवारी सोनं-चांदीच्या दरात मोठी वाढ झाली होती. त्यानंतर सोनं-चांदीच्या दरात घसरण झाल्याचे पाहायला मिळाले. गेल्या १४ दिवसांत १ किलो चांदी १.७५ लाखांनी स्वस्त झाली तर १ तोळा सोनं ३७००० रुपयांनी स्वस्त झाले आहे.

२९ जानेवारीला चांदीचा भाव ४,२०,०४८ रुपये प्रति किलोग्राम या ऐतिहासिक उच्चांकावर पोहचला होता. त्यानंतर चांदीच्या दरात मोठी घसरण झाली. सध्या चांदी २,४४,३६० रुपयांच्या आसपास पोहचली आहे. म्हणजेच दोन आठवड्यात चांदी जवळपास १,७५,६७७ रुपयांनी स्वस्त झाली आहे.

तर दुसरीकडे, सोन्याच्या किमतींमध्येही असाच ट्रेंड राहिला आहे. २९ जानेवारी रोजी सोन्याचा दर प्रति १ तोळा १,९३,०९६ या विक्रमी उच्चांकावर पोहोचला. तेव्हापासून सोन्याच्या दरात घसरण झाल्याचे पाहायला मिळत आहे. सध्याच्या किमतीच्या तुलनेत सोने त्याच्या विक्रमी उच्चांकापेक्षा अंदाजे ३७,२०१ रुपयांनी स्वस्त झाले आहे.

१३ फेब्रुवारीला म्हणजे शुक्रवारी दर किती होते?

१ तोळा सोनं- १,५५,८९५ रुपये

१ किलो चांदी - २,४४,३६० रुपये

दरम्यान, सोनं-चांदीच्या दरात घसरण झाल्यामुळे सोनं-चांदी खरेदी करण्याची चांगली संधी आहे. सोनं-चांदीचे दर वाढत असल्यामुळे ग्राहकांमध्ये नाराजी होती. त्यामुळे त्यांनी सोनं-चांदी खरेदी करण्याकडे पाठ फिरवली होती. आता सोनं-चांदीच्या दरात काहीशी घसरण झाल्यामुळे ते सोनं-चांदी खरेदी करू शकतात. गुड रिटर्न्सच्या माहितीनुसार, २४ कॅरेटचं १ तोळा सोनं शनिवारी १,५७,७५० रुपयांना विकले गेले. तर १ किलो चांदी २,७५,००० रुपयांना विकली गेली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gold Rate Today : सणासुदीच्या काळात सोनं महागलं, १ तोळ्याची किंमत किती? जाणून घ्या 22k, 18k, 24k चे ताजे दर

Maharashtra News Live Update: शहापूरमध्ये अंगावर वीज पडून एकाचा मृत्यू

LPG Subsidy : १ ऑक्टोबरपासून LPG ग्राहकांसाठी नवा नियम; सबसिडी हवी असेल तर आजच करा हे काम

Water for kidney health: किडनी खराब होऊ नये म्हणून दिवसातून किती पाणी प्यायलं पाहिजे?

Pune : गणपती विसर्जनात DJ वाजवला, पुण्यातील १० मंडळांवर पोलिसांची मोठी कारवाई

SCROLL FOR NEXT