Customers check gold ornaments as gold and silver prices witness a sharp fall in the bullion market. 
बिझनेस

Gold Price : अचानक किंमती घसरल्या! चांदी ₹१७०००, सोनं ₹३००० ने स्वस्त; वाचा 24K, 22K, 18K गोल्डचे ताजे दर

latest gold price today : सोनं आणि चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. २४K, २२K, १८K गोल्डचे ताजे दर जाणून घ्या. चांदी तब्बल ₹१७,००० स्वस्त झाली असून ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

Namdeo Kumbhar

Gold Silver Price Today : आज सकाळी पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीमध्ये ३ रूपयांची वाढ झाल्यानंतर देशातील महागाई वाढणार असल्याची चर्चा सुरू झाली. त्यातच २ दिवसांपूर्वी केंद्र सरकारने आयात करण्यात येणाऱ्या सोन्यावरील कस्‍टम ड्युटी वाढवली होती. त्यामुळे २ दिवसांपासून सोन्याच्या किंमतीत मोठी वाढ झाली होती. पण शुक्रवारी अचानक सोनं आणि चांदीच्या दरात मोठी घसरण पाहायला मिळाली. सकाळी सराफा बाजार उघडताच सोन्याच्या दरात प्रतितोळा ३ हजार रूपयांची घसरण झाली, तर चांदीच्या किंमतीमध्ये १७ हजार रूपयांची कपात नोंदवण्यात आली. सोनं आणि चांदीच्या किंमती अचानक का घसरल्या? आखाती देशातील तणाव आणि कच्च्या तेलाच्या वाढत्या किंमतीचा परिणाम सोन्याच्या दरावर झाल्याचे तज्ज्ञांनी सांगितलेय.

आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडीचा परिणाम सोन्याच्या दरावर होतो. जागतिक अस्थिरता आणि आर्थिक धोरणातील बदलांचा थेट परिणाम भारतामधील सराफा बाजारावरही दिसून आला. २ दिवसांपूर्वी विक्रमी दरवाढ नोंदवलेल्या सोने आणि चांदीच्या दरात शुक्रवारी घसरण झाली. चांदीची किंमत प्रति किलो १७ हजार रूपयांनी कमी झाली. तर सोन्याची किंमत प्रति तोळा ३ हजार रूपयांनी कपात झाली. लग्नसराईत सोनं स्वस्त झाल्यामुळे ग्राहकांमध्ये उत्साह आहे. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोनं खरेदी करणं टाळा, असे आवाहन केल्याने विक्रीत ५० टक्क्यांची घट आल्याचे तज्ज्ञांकडून सांघण्यात आले.

एमसीएक्स (MCX) आणि सराफा बाजारात सोने आणि चांदीच्या दरात घसरण झाली. शुक्रवारी सकाळी, मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर सोन्याचा भाव प्रति तोळा ₹२,९१८ ने घसरून ₹१,५९,०६० इतका झाला. दरम्यान, चांदीचा भाव प्रति किलो ₹१६,८६३ (५ टक्क्यांहून अधिक) ने घसरून ₹२,७४,२३९ वर आला. सराफा बाजारातही सोने आणि चांदी या दोन्हींच्या दरात घसरण झाली. नवी दिल्लीच्या सराफा बाजारात २४ कॅरेट सोन्याचा भाव प्रति तोळा ₹२,९२० ने घसरून ₹१,५९,१६० इतका झाला. तर चांदी प्रति किलो १७५९० रूपयांनी स्वस्त होऊन ₹२,७३,१४० वर आली आहे.

अचानक किंमती कमी का झाल्या?

मागील काही दिवसांपासून भारतामधील सराफा बाजारात सोनं आणि चांदीच्या किंमतीमध्ये चढ उतार पाहायला मिळत आहे, याचा सर्वाधिक फटका सर्वसामान्यांना बसलाय. तज्ज्ञांच्या मते सोने आणि चांदीच्या किमतींमधील घसरण ही जागतिक घडामोडींमुळे झाली आहे. वाढती महागाई आणि व्याजदरवाढीची अपेक्षा या घसरणीचं प्रमुख कारण आहे. मोठ्या व्याजदरांपासून तात्काळ दिलासा मिळण्याची शक्यता नाही. त्याशिवाय, जागतिक स्तरावरील सुरू असलेल्या भू-राजकीय तणावाचाही किमतींवर परिणाम होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jantar Mantar Protest: जंतरमंतरवर पुन्हा परिस्थिती बिघडली; विद्यार्थ्यांवर पुन्हा लाठीचार्ज, पोलिसांवर दगड, बाटल्या फेकल्या

नागपुरात धक्कादायक घटना! दुपारी सुट्टीच्या वेळी चक्कर आली; उपचारादरम्यान तिसरीच्या विद्यार्थ्याचा मृत्यू

Schools Closed: पालघर जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालय आणि अंगणवाड्यांना उद्या सुट्टी,काय आहे कारण जाणून घ्या

दिल्लीतील आंदोलनात मराठा एल्गार, पुन्हा हल्ला केल्यास सरकारचा माज उतरवणार

दिल्लीत शरद पवार-पंतप्रधान मोदींची भेट भेटीमागे नेमकं गुपित काय?

SCROLL FOR NEXT