Petrol Diesel Price Saam TV
बिझनेस

Petrol Diesel Price: सर्वसामान्यांच्या खिशाला फटका बसणार! पेट्रोल डिझेलच्या दरात वाढ होणार

Petrol Diesel Price Hike: रुपया घसरल्याने महागाई वाढण्याची शक्यता आहे. सध्या १ डॉलरची किंमत ८७ रुपये आहे. त्यामुळे पेट्रोल डिझेलच्या भावात वाढ होण्याची शक्यता आहे.

Siddhi Hande

विधानसभा निवडणुकीनंतर महागाई कमी होईल, अशी आशा सर्वसामान्यांना होती. पेट्रोल डिझेलपासून ते भाजीपाल्यापर्यंत सर्वांचे दर कमी होतील, असं सर्वसामान्यांना वाटत होतं. मात्र, सध्या तरी असं काहीही होणार नाही. याउलट पेट्रोल डिझेलचे दर महागणार असल्याचे सांगितले जात आहे. (Petrol Diesel Price)

आता रुपयावर डॉलर भारी पडू लागला आहे. मागील वर्षी जानेवारीत एका डॉलरसाठी ८३ रुपये मोजावे लागत होते. मात्र, आता डॉलरची किंमत वाढली आहे. १ डॉलरची किंमत ८७ रुपये झाली आहे. त्यामुळे महागाई वाढण्याची शक्यता आहे.

इंधन होणार महाग

भारत ८४ टक्के इंधन आयात करतो. त्यासाठी डॉलरमध्ये व्यव्हार केले जातात. रशियाने भारताला कच्चे तेल देऊ नये, अशी तंबी डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली आहे. त्यामुळे कच्च्या तेलाच्या किंमती वाढणार हेत. डॉलर महाग झाला आहे. त्यात कच्च्या तेलाच्या किंमतीदेखील वाढल्या आहेत. यामुळेच पेट्रोल डिझेलचे दर वाढू शकतात.

मोबाईल- लॅपटॉपचे दर वाढणार

डॉलर महागल्यानंतर आता मोबाईल आणि लॅपटॉपचे दर महागणार आहे. भारतात मोबाईल उत्पादन जास्त प्रमाणात होत असले तरीही त्याचा कच्चा माल हा परदेशातून येतो. हा कच्चा माल मागवण्यासाठी जास्त पैसे लागतात. त्यामुळे इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या आयातीवर डॉलरचा परिणाम होणार आहे. यामुळे मोबाईल, लॅपटॉप आणि इतर इलेक्ट्रॉनिक्स वस्तू महागणार आहेत.

शिक्षण

भारतातील हजारो तरुण हे परदेशात शिकण्यासाठी जातात. परदेशात शिकताना त्यांना डॉलरमध्ये फी भरावी लागते. त्यामुळे त्या खर्चात वाढ होणार आहे. यामुळे परदेशात शिक्षण घेणे आता आधीपेक्षा महाग होणार आहे. याचसोबत परदेशात फिरायला जाण्याचा खर्चदेखील वाढणार आहे. सर्व व्यव्हार हे डॉलरमध्ये होणार असल्याने आपोआप तुमच्या खिशाला फटका बसणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: मोठी बातमी! कोकणातील बडा नेता भाजपच्या गळाला; उद्या थाटामाटात होणार पक्षप्रवेश

Crime: प्रेमसंबंधाला विरोध, बापाने मुलीला संपवलं; आधी कीटकनाशक पाजलं नंतर...

Narayan Rane : मोठी बातमी! भाजप नेते खासदार नारायण राणे रुग्णालयात दाखल

Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांच्या उलट्या बोंबा; भारतावरच केला मोठा आरोप

GST Reform: आता GST मध्ये फक्त 2 स्लॅब, नवीन दर 22 सप्टेंबरपासून होणार लागू

SCROLL FOR NEXT