Poonam Dhillon: अभिनेत्री पूनम ढिल्लोंच्या घरी चोरी; ५०० अमेरिकन डॉलर पळवणाऱ्याला ठोकल्या बेड्या

Actress Poonam Dhillon House Theft : प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री पूनम ढिल्लोंच्या घरी चोरी झाली आहे. चोराने ५०० अमेरिकन डॉलरची चोरी केली आहे. हा चोरटा पोलिसांनी पकडला आहे. नेमकं काय झाले जाणून घ्या.
Actress Poonam Dhillon House Theft
Poonam DhillonGOOGLE
Published On

बॉलिवूड अभिनेत्री पूनम ढिल्लोंच्या (Poonam Dhillon) घरी चोरी झाली आहे. चोरट्यांनी हिऱ्याचे कानातील टॉप, काही रक्कम आणि अमेरिकन डॉलरची चोरी केली आहे. हा चोरटा दुसरा तिसरा कोणी नसून पूनमच्या घरी रंगकाम करण्यासाठी आलेला कारागीर होता. त्याने घरात संधी साधून चोरी केली. मात्र पोलीसांनी चोराला अटक केले आहे.

पूनम ढिल्लोंच्या पाली हिल येथील घरात ही चोरी झाली आहे. पूनम ढिल्लोंने याची तक्रार खार पोलिसांना केली. चोरी करणाऱ्या चोरट्याचे नाव समीर सलीम अन्सारी होते. त्याचे वय ३७ वर्ष आहे. चोरी करण्यात आलेले हिऱ्याचे कानातले आणि ५०० अमेरिकन डॉलर जप्त करण्यात आले आहे.

बॉलिवूड अभिनेत्री पूनम ढिल्लोंच्या घरी चोरी प्रकरणी पोलिसांनी कडक कारवाई केली आहे. पोलीसांनी चोराला अटक केली आहे. पूनमच्या घरी ही चोरी झाली आहे. मीडिया रिपोर्टनुसार, घरातून अंदाजे एक लाख रुपयांचा हिऱ्याचे कानातले, 35 हजार रुपयांची रक्कम आणि अमेरिकन डॉलर्स चोराने पळवले आहे.

पोलीसांनी 6 जानेवारी रोजी चोराला अटक केली आहे. पोलीस तपासातून असे समोर आले की, आरोपी समीर अन्सारी अभिनेत्रीच्या घरी फ्लॅट रंगविण्यासाठी येत होता. तो 28 डिसेंबर ते 5 जानेवारी दरम्यान अभिनेत्रीच्या घरी होता. काम करताना अभिनेत्रीच्या घरातील कपाट उघडे होते. त्यावेळी चोरट्याने कपाटातील मौल्यवान वस्तू चोरल्या. उघड्या कपाटाचा चोराने पूर्ण फायदा घेतला. मात्र अखेर त्याला अटक करण्यात पोलीसांना यश आले आहे.

Actress Poonam Dhillon House Theft
The Sabarmati Report Announcement: विक्रांत मेस्सीचा नवा चित्रपट, '12 वी फेल' नंतर 'द साबरमती रिपोर्ट' मधून येणार प्रेक्षकांच्या भेटीला

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com